जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

केंद्र सरकारकडून रस्त्यासाठी १५ कोटींचा निधी -दावे मात्र अनेक !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव मतदारसंघातील रस्ते विकासासाठी केंद्र शासनाने कोपरगाव-कोळपेवाडी या रस्त्यासाठी १५ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली असताना त्यावर विधानपरिषद आ.विवेक कोल्हे यांनी दावा केला असल्याने हा निधी नेमका कोणी दिला ? असा सवाल निर्माण झाला आहे.याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

 

दरम्यान या रस्त्याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे कडून काम मंजूर केले असल्याचा दावा आ.आशुतोष काळे यांनी केला असला तरी त्यानंतर अवघ्या काही मिनिटात विधानपरिषदेचे आ.विवेक कोल्हे यांनी असाच दावा केला आहे.त्यामुळे हे काम नेमके कोणी केले ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.बऱ्याच वेळा दोघे दावा करतात पण काम तिसऱ्याने केलेले असते.असा अनुभव बऱ्याच वेळा आलेला आहे.यापूर्वी केंद्र सरकारने आपल्या देशपातळीवर आखलेल्या धोरणात्मक कामाचे राज्याचा सुतराम संबंध नसलेल्या कामाचे श्रेय घेताना ही मंडळी आढळून आली आहे.

     कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था सर्वांना माहिती आहे.मात्र रस्त्यांसह विविध कामांचे श्रेय घेण्यासाठी मात्र तालुक्यातील नेते कोणीही कमी पडताना दिसून येत नाही.नुकत्याच शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी मंजूर केलेल्या वीस कोटी रुपये खर्चाच्या साईबाबा कॉर्नर ते कोपरगाव रेल्वे स्थानक या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले आहे.त्यासाठी श्रेय मात्र ईशान्य गडाच्या नेत्यांनी घेतले असताना त्यांची मोठी परवड झाली असल्याचे दिसून आले आहे.त्यांचे जनसंपर्क विभागाचे अधिकारी निमंत्रण पत्रिका घेऊन खा.वाकचौरे यांचेकडे गेले असता त्यांची कानउघडणी केली असल्याची बाब लपून राहिली नाही.परिणामी त्यांची आधी पत्रिका छापूनही उपयोग झाला नाही.त्यात ऐनवेळी बदल करून त्यात भूमिपूजन या अखेर नाईलाजाने खा.भाऊसाहेब वाकचौरे हस्ते करावे लागले असल्याचे उघड झाले होते.त्यामुळे यांची मोठी नामुष्की झाली होती.सदर काम हे येवला येथील ठेकेदाराचे नावावर घेतले असले तरी ते आपल्या नाशिक येथील भगवान शंकराचे पर्याय वाचक नाव असलेल्या पवार नामक आप्तस्वकीयांच्या नावांवर घेऊन ठेवले असल्याची बाब झाकून राहिली नाही.त्यासाठी कोपरगाव तालुक्यातील अनेक ठेकेदाराचा बळी गेला असल्याचे बोलले जात आहे.त्यांना अनेक गाजरे टांगून ठेवली असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे कामाची गुणवत्ता कशी राहणार हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज उरली नाही.त्या जुन्या कामाचे निघालेल्या मटेरियल पुन्हा त्याच नव्या कामात वापरले जात असल्याचे आरोप होऊ लागले आहे.त्यामुळे या रस्त्यांची दुरावस्था पाहिले पाढे पंचावन्न झाले तर नवल वाटावयास नको.

   दरम्यान या रस्त्याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे कडून काम मंजूर केले असल्याचा दावा आ.आशुतोष काळे यांनी केला असला तरी त्यानंतर अवघ्या काही मिनिटात विधानपरिषदेचे आ.विवेक कोल्हे यांनी असाच दावा केला आहे.त्यामुळे हे काम नेमके कोणी केले ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.बऱ्याच वेळा दोघे दावा करतात पण काम तिसऱ्याने केलेले असते.असा अनुभव बऱ्याच वेळा आलेला आहे.यापूर्वी केंद्र सरकारने आपल्या देशपातळीवर आखलेल्या धोरणात्मक कामाचे राज्याचा सुतराम संबंध नसलेल्या कामाचे श्रेय घेताना ही मंडळी आढळून आली आहे.विधानसभा निवडणूकपूर्व काळात रेल्वेच्या भुयारी पुलांचे काम दोन्ही आमदारांनाही आणि त्यांच्या पूर्वसूरिणी आपल्या नावावर खपवले असल्याचे आढळून आले आहे.उदाहरणादाखल निळवंडे,उजनी चारी,समृद्धी महामार्ग,विमानतळ आदी कामाची मोठी जंत्रीच आहे.कोपरगाव तालुक्यातील या नेत्यांनी हि कामे मंजूर केले असले तर त्याचा पाठपुरावा केल्याचे कोणतेही लेखी पुरावे ही मंडळी देत नाही हे विशेष ! केवळ त्यांनी म्हटले म्हणून बातम्या देणे पत्रकारांना आता चांगलेच महाग पडताना दिसून येत आहे.राहाता तालुक्यातील आणि कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा येथील स्मशान भूमीची मंजुरी ही विधानपरिषद निवडणूक नुकतीच संपन्न झाली असताना अशीच वादात अडकली असल्याचे आणि इशान्य गडाचे हसू झाल्याचे अनेकांनी पाहिले आहे.त्यामुळे आगामी काळात त्याचे पुरावे त्यांनी सादर करावे म्हणजे त्या बातम्यांची विश्वासाहर्ता टिकून राहण्यास मदत होणार आहे.मात्र ते हे करतील अशी शक्यता कमी दिसत आहे.त्यामुळे हा 15 कोटी रुपयांचा निधी खा.वाकचौरे यांनी मंजूर केला नसला म्हणजे मिळवली.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close