जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

रामपूरवाडी मार्गे वाकडी-पुणतांबा रस्त्यासाठी निधी मंजूर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील वाकडी-रामपूरवाडी-पुणतांबा या रस्त्यासाठी रस्ते,पूल दुरुस्ती कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत ३.२५ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच दिली आहे.

“मागील अनेक वर्षापासून हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी या भागातील नागरीक सातत्याने मागणी करीत होते.या रस्त्याने रोज तीन ते चार हजार नागरिकांची नियमितपणे ये-जा असते.रामपूरवाडीवरून पुणतांबा,वाकडी,गणेशनगर,राहाता तसेच श्रीरामपूरला जाण्यासाठी हा मार्ग अतिशय महत्वाचा आहे.या रस्त्यामुळे वाकडी ते पांढरी वस्तीवर येणाऱ्या नागरिकांची देखील सोय होणार आहे”-आ.आशुतोष काळे

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील वाकडी-रामपूरवाडी-पुणतांबा गावातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱ्या वाकडी-रामपूरवाडी-पुणतांबा या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या गावातील शेतकरी,नागरिक व या रस्त्यावर नियमितपणे ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी या गावातील नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव दाखल करून या रस्त्याच्या नूतनीकरण करण्यासाठी निधी मिळावा यासाठीं पाठपुरावा सुरु होता.त्या पाठपुराव्यातून या प्रस्तावास सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी देवून कोल्हार,राजुरी,गोल्हारवाडी,वाकडी,रामपूरवाडी,पुणतांबा या प्रजिमा -८७ या अतिशय महत्वाच्या जवळपास १२ किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल ३ कोटी २५ लाख रुपये निधी मंजूर केला आहे.

मागील अनेक वर्षापासून हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी या भागातील नागरीक सातत्याने मागणी करीत होते.या रस्त्याने रोज तीन ते चार हजार नागरिकांची नियमितपणे ये-जा असते.रामपूरवाडीवरून पुणतांबा,वाकडी,गणेशनगर,राहाता तसेच श्रीरामपूरला जाण्यासाठी हा मार्ग अतिशय महत्वाचा आहे. या रस्त्यामुळे वाकडी ते पांढरी वस्तीवर येणाऱ्या नागरिकांची देखील सोय होणार आहे.या रस्त्याला सद्यस्थितीला अनेक ठिकाणी मोठे खड्डे आहेत. त्यामुळे नागरिकांना त्याचा अतोनात त्रास सहन करावा लागत होता.जानेवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या रामपूरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत या नागरिकांना या रस्त्याचे आश्वासन दिले होते.त्या शब्दाची पूर्तता करून नागरिकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास व टाकलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असून यापुढे देखील या अकरा गावातील रस्ते,वीज,पाणी आदी महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे आ.काळे यांनी सांगितले आहे.या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री ना.अजित पवार व सार्वजनिक बांधकाममंत्री ना.अशोक चव्हाण यांचे सहकार्य मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close