जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात अवैध ठिकाणी दारू दुकान,तक्रार करूनही दखल नाही

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील देशी दारु परवाना धारकाने अनधिकृत जागेवर जिल्हाधिकारी यांची कुठलेही परवानगी नसताना खुलेआम सर्रासपणे देशी दारू दुकानाचा व्यवसाय सुरु ठेवला असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दारू दुकान स्थलांतर करण्याकरिता महाराष्ट्र देशी दारू नियम २५ प्रमाणे जिल्हाधिकारी यांचे पूर्वमान्यतेनेच परवाना स्थंलांतर करणे बंधनकारक आहे.त्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडेच अर्ज सादर करावा लागतो.त्या सोबत ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेऊन ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते मात्र या पातळीवर शुकशुकाट असताना सुरेगावात हा प्रताप सुरु आहे हे विशेष !

या बाबत विशाल अनिल जाधव यांनी गेल्या तीन महिन्यापूर्वी अधिरक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागास लेखी तक्रार अर्जाद्वारे पुराव्यासाहित निदर्शनास आणून दिले होते. या तक्रार अर्जात विशाल जाधव यांनी स्पष्ट पणे खुलासा केला होता की,” प्रमिला जाधव यांचा परवाना शासनाच्या मंजूरी प्रमाणे सर्व्हे नं. ११० मध्ये असताना देखील ते दुकान सर्वे नं.१११ घर मिळकत नं.३९३ मध्ये बेकायदेशीर रित्या शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत पणे स्थलांतर केले आहे.वास्तविक पाहता परवाना स्थलांतर करण्याकरिता महाराष्ट्र देशी दारू नियम २५ प्रमाणे जिल्हाधिकारी यांचे पूर्वमान्यतेनेच परवाना स्थंलांतर करणे बंधनकारक आहे.त्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडेच अर्ज सादर करावा लागतो.त्या सोबत ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेऊन ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते तसेच अकृषक प्रमाणपत्र कायदा व सुव्यवस्था बाबत पालिस प्रशासनाचा दाखला बांधकाम अधिकृत असलेबाबत दाखला,अंतर निर्बधमुक्त प्रमाणपत्र,तसेच मुंबई दारूबंदी नियम-१९५४ अंतर्गत नियम-४ प्रमाणे स्थलांतर शुल्क शासनास अदा करावे लागते.या सर्व गोष्टीची पूर्तता न करता परवाना धारकाने शासनाची फसवणूक करून अंधारात ठेऊन बेकायदेशीर स्थलांतर करून घेतले आहे.तसेच शासनाचा महसूल बुडवलेला आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची देखील दिशाभूल केली आहे.असे असताना देखील विशाल जाधव यांच्या तक्रार अर्जाला तीन महिने उलटून गेले तरी देखील राज्य उत्पादन शुल्क विभाग या प्रकारणा कडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष का करीत आहे? संबंधितांवर कार्यवाही उत्पादन शुल्क करणार का? आणि कधी करणार ?असा सवाल विशाल अनिल जाधव यांनी उपस्थित केला आहे. नियमानुसार देशी दारू परवाना रद्द करून या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी तेव्हाच अशा बेकायदेशीर घडणाऱ्या कृत्यांना आळा बसेल अशी मागणी विशाल अनिल जाधव यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close