जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

इंदुमती भोसले यांचे निधन

न्यूजसेवा


संवत्सर-(प्रतिनिधी)

  कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील कार्यकर्ते रामराव दामोदर भोसले यांच्या धर्मपत्नी इंदुमती रामराव भोसले (वय-75) यांचे शुक्रवार दि.७ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास निधन झाले आहे.संवत्सर येथील अमरधामध्ये दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

स्व.इंदुमती भोसले यांचे छायाचित्र.

   स्व.इंदुमती भोसले या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या व शेतकरी कुटुंबातील होत्या.धार्मिक व मनमिळावू स्वभावाने त्या संवत्सर पंचक्रोशीत परिचित होत्या.मुलांना स्वतःच्या पायांवर उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

     स्व.इंदुमती भोसले या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या व शेतकरी कुटुंबातील होत्या.धार्मिक व मनमिळावू स्वभावाने त्या संवत्सर पंचक्रोशीत परिचित होत्या.मुलांना स्वतःच्या पायांवर उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.गृहिणी म्हणून त्यांनी प्रपंच यशस्वी करुन दाखवला होता.त्यांच्या पश्चात पती रामराव भोसले,मुले विजय भोसले,सतीश भोसले तसेच मुली,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.संवत्सर येथील कांदा व्यापारी शंकर भोसले यांच्या त्या आजी होत्या.त्यांच्या अंत्यविधीसमयी संवत्सर परिसरातील नातेवाईक,तसेच कार्यकते यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

   स्व.इंदुमती भोसले यांच्या निधनाचे वृत्त कळताच गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,माजी सरपंच सुलोचना ढेपले,माजी उपसरपंच विवेक परजणे यांनी त्यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close