जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

बँकेच्या ठेवी १७५ कोटीवर-…या नेत्याचा दावा!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   रिझर्व्ह बँक व शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन,कर्जवाटपातील पारदर्शकता आणि प्रभावी कर्जवसुलीच्या बळावर गौतम सहकारी बँकेने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.सन-२०२५-२६ अखेर बँकेच्या ठेवी १४८ कोटी रुपये होत्या.त्यामध्ये सातत्याने वाढ होऊन आजमितीस बँकेच्या ठेवी १७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यमात बोलताना केले आहे.

“आरबीआयचे कडक नियम,वाढती स्पर्धा आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जात गौतम बँकेने यावर्षी ऐतिहासिक आणि भक्कम कामगिरी केली आहे.सर्व वित्तीय निकषांचे पालन करून व्यवसायात नवा टप्पा गाठत मिश्र व्यवसाय २०४ कोटीहून २३८ कोटीवर गेला आहे.बँकेकडे १४८ कोटीच्या ठेवी व कर्ज येणे ८९ कोटी ५६ लाख असून बँकेला यावर्षी ढोबळ नफा ०४ कोटी १४ लाख ०६ हजार झालेला आहे”-बापूसाहेब घेमुड,प्रशासकीय अधिकारी,गौतम सहकारी बँक.

  जिल्ह्याच्या सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या गौतम सहकारी बँकेची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज गौतमनगर येथील बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे.त्यावेळी ते बोलत होते.या सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष संजय आगवण हे होते.

  सदर प्रसंगी माजी आ.अशोक काळे आणि आ.आशुतोष काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,संचालक दिलीप बोरनारे,सुधाकर रोहोम,सूर्यभान कोळपे,श्रीराम राजेभोसले,डॉ.मच्छिंद्र बर्डे,प्रशांत घुले,सुनील मांजरे,शंकरराव चव्हाण,मनोज जगझाप,दिनार कुदळे,श्रावण आसने,तसेच ज्येष्ठ नेते कारभारी आगवण,विश्वास आहेर,ज्ञानदेव मांजरे,बाबासाहेब कोते, सोमनाथ चांदगुडे,सुभाष गाडे,शरद पवार पतसंस्थेचे अध्यक्ष देवेंद्र रोहमारे,गौतम सहकारी कुक्कुट पालनचे अध्यक्ष विजय कुलकर्णी,बँकेचे उपाध्यक्ष विजय रक्ताटे,सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ सदस्य,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे,प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे,पद्मविभूषण शरदचंद्र पवार पतसंस्थेचे व्यवस्थापक मंगेश देशमुख,गौतम सहकारी कुक्कुट पालनचे व्यवस्थापक सुरेश पेटकर,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे,आदी मान्यवर उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”गौतम सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र अहिल्यानगर,नाशिक,ठाणे,पुणे व संभाजीनगर आदी जिल्ह्यांमध्ये असून,नऊ शाखांच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह विविध घटकांच्या आर्थिक गरजा वेळेत पूर्ण करण्याचे काम बँक करीत आहे.आवश्यक कागदपत्रांची योग्य पडताळणी करूनच कर्जवाटप करण्याची पद्धत तसेच कर्जवसुलीवर असलेले विशेष लक्ष यामुळे बँकेचे आर्थिक कामकाज सक्षमपणे सुरू आहे.

  यावेळी बोलताना आ.काळे म्हणाले की,”माजी खा.कर्मवीर शंकरराव काळे यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवून उभ्या केलेल्या सहकारी संस्थांना प्रगतीपथावर नेण्याचे आणि त्यांना नावारूपाला आणण्याचे काम केले.त्यानंतर या सर्व संस्था यशाच्या शिखरावर नेण्याचे काम माजी आ.अशोक काळे यांनी केले असून आजही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी संस्था उत्तम पद्धतीने सुरू आहेत.गौतम बँकेची स्पर्धा खासगी बँकांशी आहे.खासगी बँकांच्या बरोबरीने आपल्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या आधुनिक सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न बँक करीत आहे. खासगी बँकांकडे ग्राहक असतात;मात्र आपल्या बँकेशी सभासदांचे केवळ ग्राहक म्हणून नव्हे,तर आपुलकीचे आणि विश्वासाचे नाते असल्याचा दावा त्यांनी शेवटी केला आहे.

  सदर प्रसंगी प्रास्तविक प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी केले त्यात त्यांनी,”आरबीआयचे कडक नियम,वाढती स्पर्धा आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जात गौतम बँकेने यावर्षी ऐतिहासिक आणि भक्कम कामगिरी केली आहे.सर्व वित्तीय निकषांचे पालन करून व्यवसायात नवा टप्पा गाठत मिश्र व्यवसाय २०४ कोटीहून २३८ कोटीवर गेला आहे.बँकेकडे १४८ कोटीच्या ठेवी व कर्ज येणे ८९ कोटी ५६ लाख असून बँकेला यावर्षी ढोबळ नफा ०४ कोटी १४ लाख ०६ हजार झालेला आहे.त्यातून सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता करून निव्वळ नफा ०१ कोटी ३५ लाख  ४८ हजार झाला आहे.तसेच मागील काही वर्षापासून बँकेचा निव्वळ एनपीए ०% असल्याचे सांगितले आहे.

      सदर प्रसंगी विषयपत्रिका वाचन,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे,तर सभेचे सूत्रसंचालन वैभव महाजन यांनी केले तर आभार बँकेचे अध्यक्ष  संजय आगवन यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close