जाहिरात-9423439946
खेळजगत

कोपरगावातील…या महाविद्यालयांत बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमय्या महाविद्यालय येथे कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन व महाविद्यालयाच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात प्रथम पारितोषिक ऋता गोरे व फाल्गुनी निकुंभ,द्वितीय पारितोषिक रूपाली टेके व प्रांजल अंधारे तर तृतीय पारितोषिक हर्षदा कट्यार व वेदश्री बंडेवार यांनी पटकावले.मिक्स डबल गटात प्रथम पारितोषिक मॉन्टी तिवाडी व वेदश्री बंडेवार,द्वितीय पारितोषिक दीप रांभिया व नमिता शेट्टी,तर तृतीय पारितोषिक गणेश सपकाळ व फाल्गुनी निकुंभ यांनी पटकावले आहे.यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

राज्यस्तरीय बॅडमिंटन पुरुष ओपन दुहेरी स्पर्धेत प्रथम पारितोषिक दीप रांभिया व शुभम पाटील,द्वितीय पारितोषिक वसीम खान व सलमान अन्सारी तर तृतीय पारितोषिक तेजस खोमणे व गणेश सपकाळ यांनी पटकावले आहे.३५ वयोगटावरील पुरुष दुहेरी सामन्यात प्रथम पारितोषिक डॉ.प्रीतम जपे व चंदन जाधव,द्वितीय पारितोषिक डॉ.डुंगरवाल व शेखर दायमा तर तृतीय पारितोषिक राकेश पेठारे व वैभव अंबी यांनी पटकावले आहे.

कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमय्या महाविद्यालय येथे कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन व महाविद्यालयाच्या वतीने कोपरगाव तालुक्याचे माजी आ. कै.के.बी.रोहमारे यांच्या स्मरणार्थ दोन दिवसीय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.त्या स्पर्धेचे उद्घाटन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांचे हस्ते करण्यात आले होते.

सदर प्रसंगी संस्थेचे सचिव अॅड.संजिव कुलकर्णी,गोदावरी बायोरिफायनरीज लि.चे संचालक सुहास गोडगे,बाळासाहेब पालवे,कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष संदिप रोहमारे,सचिव सत्येन मुंदडा,सुनिल बोरा,सागर रोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांच्या हस्ते करण्यात आले.या बॅडमिंटन स्पर्धेसाठी राज्यभरातून विविध खेळाडू,संघनायक आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
दोन दिवस खेळल्या गेलेल्या या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत राज्यभरातून अनेक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता.ही स्पर्धा महिला(डबल),पुरुष ओपन(डबल),मिक्स डबल,३५ वयोगटावरील पुरुष (डबल) असे चार गट तयार करण्यात आले होते.

यामध्ये पुरुष ओपन दुहेरी स्पर्धेत प्रथम पारितोषिक दीप रांभिया व शुभम पाटील,द्वितीय पारितोषिक वसीम खान व सलमान अन्सारी तर तृतीय पारितोषिक तेजस खोमणे व गणेश सपकाळ यांनी पटकावले आहे.३५ वयोगटावरील पुरुष दुहेरी सामन्यात प्रथम पारितोषिक डॉ.प्रीतम जपे व चंदन जाधव,द्वितीय पारितोषिक डॉ.डुंगरवाल व शेखर दायमा तर तृतीय पारितोषिक राकेश पेठारे व वैभव अंबी यांनी पटकावले आहे. या स्पर्धेसाठी महिला डबल गटात प्रथम बक्षीस अनुक्रमे रु.७,०००, ५०००,२००० तर मिक्स डबल प्रथम बक्षीस अनुक्रमे रु.७०००,५०००,२०००असे ठेवण्यात आले होते.

दरम्यान पुरुष ओपन (डबल) गटात प्रथम बक्षीस क्रमशा रु.२१०००,११०००,५०००तर ३५ वयोगटातील पुरुष (डबल) प्रथम बक्षीस रु.१५००० द्वितीय ७००० तृतीय ३०००असे ठेवण्यात आलेले होते.

सदर पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोपरगाव तालुक्‍याचे आ.आशुतोष काळे हे उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक प्राप्त सर्व विजेत्यांना रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या दोनदिवसीय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे यशस्वी आयोजन कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे सर्व पदाधिकारी,महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ.सुनील कुटे,क्रिडा शिक्षक मिलिंद कांबळे,कार्यलयीन अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.जी.एन.डोंगरे,प्रा.सुजित पानगव्हाणे,किशोर गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close