जाहिरात-9423439946
खेळजगत

भारतीय पॉवरलिफ्टींग संघात कोपरगावातील…या खेळाडूंची निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

आगामी १७ जून ते २१ जून या कालावधीत कोईम्बतुर (तामिळनाडू ) येथे संपन्न होणाऱ्या सिनिअर ओपन आशियाई पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी येथील श्री.सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालयाचा पॉवरलिफ्टींग खेळाडू आश्विन सोलंकी याची भारतीय पॉवरलिफ्टींग संघात निवड झाली आहे.त्याच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आश्विन सोलंकी याने एप्रिल २०२२ मध्ये राजस्थान विद्यापीठ,उदयपूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ९३ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले होते.त्याच्या यां निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आश्विन सोलंकी याने एप्रिल २०२२ मध्ये राजस्थान विद्यापीठ,उदयपूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ९३ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले होते.तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ९३ किलो वजन गटात स्कॉट ३३० किलो, बेंच प्रेस १८० किलो, डेडलिफ्ट ३१५ किलो असे एकूण ८४५ किलो वजन उचलून विद्यापीठ विक्रमासह सुवर्णपदक संपादन करीत स्ट्राँग मॅन ईन युनिव्हर्सिटी २०२२ हा किताब संपादन केला. सोलंकी यांच्या या दैदिप्यमान कामगिरीने महाविद्यालयाच्या व रयत शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुभाष देशमुख यांचे त्याला मार्गदर्शन लाभले होते.
त्याच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगीरथ शिंदे,रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आ.आशुतोष काळे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बिपिन कोल्हे,सुनील गंगुले,दिलीप दारुनकर,संदीप वर्पे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप आदी मान्यवरांसह महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांचे उपप्राचार्य,प्राध्यापक,शिक्षकेतर सेवक यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close