जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

कोपरगाव येथील खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत थोरात विजेता

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील एस.एस.जी.एम.महाविद्यालयातील इ.१२वी तील विद्यार्थी अथर्व महेश थोरात याने कोपरगाव येथील ब्राह्मण सभा आयोजित माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत नामांकित खेळाडूंवर मात करत खुल्यागटात एकूण ५ डावामध्ये अजिंक्य राहून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.या स्पर्धेत एकूण ७५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

बुद्धिबळ सध्या जगातील सर्वांत प्रसिद्ध बैठ्या खेळांपैकी एक आहे.जगभरात अदमासे ६० कोटी हौशी किंवा व्यावसायिक लोक क्लब्जमध्ये, पत्राने, आंतरजालावर व विविध स्पर्धांमधून बुद्धिबळ खेळतात. बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाप झालेला दिसतो.कोपरगावात नुकतेच या स्पर्धांचे आयोजन माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांचे वाढदिवसा निमित्त करण्यात आले होते.

या पूर्वी अथर्वने संगमनेर येथील बुद्धीबळ स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले होते.त्याला क्रिडाशिक्षक नितीन सोळके यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.चि.अथर्व याच्या यशस्वी कामगिरी बद्दल ब्राह्मणसभेचे अध्यक्ष मकरंद कोह्रळकर,संदिप देशपांडे,एस.एस.जी.एम काॅलेजचे प्राचार्य डाॅ. शंकर थोपटे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,नगराध्यक्ष विजय वहाडणे,बाबासाहेब गांगर्डे, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके,कोपरगाव चेस क्लबचे राजेंद्र कोळपकर,नितीन जोरी,यश बंब,प्रमोद वाणी,संकेत गाडे,कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष बापूराव थोरात यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close