जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सामाजिक उपक्रम

कोपरगावात निराधारांची शस्त्रक्रिया करून शिवरायांना आदरांजली

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर शिवसेना द्वारा वयोवृद्ध,निराधार,अंध व्यक्तीं श्री.वखारे गुरु यांची नेत्ररोग शस्त्रक्रिया करून त्यांना द्रुष्टी प्रदान करुन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते या दिवशी विविध संघटना विविध सांस्कृतिक उपक्रमांनी हा जयंती उत्सव साजरा करतात मात्र कोपरगाव शहर शिवसेनेने मात्र यावेळी वेगळा पायंडा निर्माण केला आहे-कलविंदर दडीयाल शहरप्रमुख.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते या दिवशी विविध संघटना विविध सांस्कृतिक उपक्रमांनी हा जयंती उत्सव साजरा करतात मात्र कोपरगाव शहर शिवसेनेने मात्र यावेळी वेगळा पायंडा निर्माण केला आहे.नेत्र विकार असलेल्या निराधार नागरिकांना पुन्हा दृष्टी देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यात गेली दहा पंधरा वर्षांपासून श्री. वखारे गुरु नेत्रहीन होते. त्यांची कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल मध्ये डॉ.तेजश्री अमित नाईकवाडे व डॉ. प्रशांत सलगिले यांनी १९ फेब्रुवारी रोजी अवघड अशी नेत्र शस्त्रक्रिया यशस्वी करून त्यांना नेत्रज्योत देऊन त्यांच्या जिवनात नवीन प्रकाश फुलवला. त्यासाठी कोपरगाव शिवसेनेचे राजेंद्र झावरे जिल्हाध्यक्ष,कलविंदर सिंग दडीयाल शहराध्यक्ष यांनी हॉस्पिटल चा खर्च केला,भरत मोरे एस.टी कामगार सेना यांनी सुध्दा त्यांचे मेडीकल असुन मेडीकल खर्च देण्यात आला आहे.
तसेच संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे चांगदेव कातकडे व डॉ. प्रसाद कातकडे,कुकुशेठ सहानी व चेतन खुबाणी यांनी मदत केली असल्याची माहिती सेनेचे शहराध्यक्ष दडीयाल यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close