जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरंगावनजीक एर्टीगा कार जळून खाक,पाच लाखांचे नुकसान

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत दि.१९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०६.३० वाजेच्या सुमारास नपावाडी येथील कार मालक शशिकांत भरणे यांनी नुकतीच नव्याने घेतलेली एर्टीगा कार घेऊन ते आपल्या चालकासह वैजापूरकडे जात असताना त्यांच्या गाडीतील बोनेटमधून अज्ञात कारणाने आग लागून त्यात त्यांची सुमारे पाच लाखांची कार जाळून खाक झाली आहे.त्यामुळे कोपरगावसह राहाता तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दि.१९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातून प्रवास करत असताना अचानक कारच्या बोनेट मधून धूर येऊ लागला असल्याचे आमच्या निदर्शनास आले बघता-बघता आगिने रौद्र रूप धारण केले व कार जळून खाक झालेली पाहण्याचा अनास्था प्रसंग कार मालकावर गुदरला आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,नपावाडी येथील फिर्यादी शशिकांत भरणे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आपण व आपला चालक प्रवीण अशोक भाकरे असे दोघे सदर गाडी चालवत माझे सोबत विशाल रमेश दहिवाल असे दि.१९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातून प्रवास करत असताना अचानक कारच्या बोनेट मधून धूर येऊ लागला असल्याचे आमच्या निदर्शनास आले बघता-बघता आगिने रौद्र रूप धारण केले व कार जळून खाक झालेली पाहण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे. त्यांना जवळ आग विझविण्यास काही साधन नसल्याने त्याना काही एक उपाय करता आले नाही.या घटनेत त्यांचे नव्या कारचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेत बहुदा टाळेबंदीच्या काळात हि कार अनेक महिने उभी राहिल्याने त्याची वायरिंग उंदराने कुर्तडली असावी असा कयास व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close