जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

येवला तालुक्यात ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव सोहळा संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

अंदरसुल-(प्रतिनिधी)

येवला तालुक्यातील अंदरसुल येथील ह.भ.प.संजय महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वै.ह.भ.प.सुभाष गुरू महाराज पाठक अंदरसुलकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त व श्री ज्ञानेश्वरी प्रत शुद्धी दिन निमित्त आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भव्य कीर्तन महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

या निमित्ताने पहाटे काकडा आरती,सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,सायंकाळी प्रवचने,हरिपाठ रात्री हरिकीर्तन आदी कार्यक्रम पार पडले आहे.

दरम्यान महाराष्ट्राती नामवंत कीर्तनाचार्यांनी या ठिकाणी येऊन सुश्राव्य असे ज्ञानदान केले.प्रसंगी ह.भ.प.संजय महाराज जगताप,अनिल महाराज दातार,मधुसूदन महाराज मोगल,कैलासगिरी महाराज,जगदीश महाराज जोशी,ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली),संदिपान महाराज शिंदे हसेगावकर,तसेच महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता झाली आहे.दरम्यान परिसरातील येवला,वैजापूर,कोपरंगाव तालुक्यातील भाविकांनी या कीर्तन सेवेचा व महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close