जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

शिर्डीत गोकुळाष्टमी उत्सव भक्ताविना उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्थेच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात काल रात्रौ १२.०० वाजता श्रीकृष्‍णजन्‍म कीर्तन होवुन श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव भक्ताविना साजरा करण्‍यात आला आहे. तर आज दुपारी १२.०० वाजता काल्‍याचे कीर्तनानंतर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या हस्‍ते दहीहंडी फोडण्‍यात आली आहे.

जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी,कृष्ण जन्माचा दिवस.श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्री कृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.साईबाबांना आपल्या हयातीत हा उत्सव सुरु केला आहे.तो तह्यात सुरु आहे.साई संस्थानने ही प्रथा अद्याप जोपासली आहे.

श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्‍टेजवर दिनांक ३० ऑगस्‍ट रोजी रात्रौ १०.०० ते १२.०० यावेळेत मंदिर कर्मचारी ह.भ.प.संभाजी तुरकणे महाराज यांचे श्रीकृष्‍णजन्‍म कीर्तन होवुन श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे,उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब शिंदे,मंदिर प्रमुख रमेश चौधरी,पुजारी व कर्मचारी उपस्थित होते.त्‍यानंतर श्रींची शेजारती झाली.
तसेच आज सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्‍टेजवर मंदिर पुजारी ह.भ.प.उल्‍हास वाळुंजकर महाराज यांचे काल्‍याचे कीर्तन संपन्न झाले आहे. कीर्तनानंतर १२.०० वाजता संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या हस्‍ते दहीहंडी फोडण्‍यात आली आहे.
यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी,मंदिर प्रमुख रमेश चौधरी,पुजारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदरचा श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सव कोरोना विषाणुच्‍या पार्श्‍वभुमीवर भाविकांविना व मर्यादित संस्‍थान अधिकारी आणि मंदिर पुजारी यांच्‍या उपस्थितीत यशस्‍वीरित्‍या पार पडला.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close