कोपरगाव तालुका
गोकुळचंदजी ठोळे यांची जयंती उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे संस्थापक कै.गोकुळचंद ठोळे यांची १४५ वी जयंती श्रीमान गोकुलचंद विदयालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन साईबाबा सुपर स्पेशालीटी हाॕस्पीटलचे प्रमुख डाॕ.विजय नरोडे हे होते.
“माझ्या यशामध्ये श्री.गो.विदयालयाचा सिंहाचा वाटा आहे असे स्पष्ट केले.ज्ञानदान चांगले संस्कार देवुन आदर्श विदयार्थी घडविण्याचे चांगले कार्य विदयालयाकडून होत आहे”-डॉ.विजय नरोडे,प्रमुख श्री साईबाबा सुपर स्पेशालीटी हाॕस्पीटल शिर्डी.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन साईबाबा सुपर स्पेशालीटीचे हाॕस्पीटलचे तज्ञ कार्डीआलाॕजिस्ट डाॕ.संदीप देवरे होते.तर सहसचिव सचिन अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे,डाॕ.ढाकणे,प्राथमिक विदयालयाच्या मुख्याध्यापिका मिना पाटणी,भागचंद माणिकचंद इंग्लिश मेडीयमचे प्राचार्य निमोणकर जेष्ठशिक्षक तुपसैंदर डी.व्ही,कोताडे ए.जे,काले ए.के.,गोरे एस.डी,बडजाते ए.के पालक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद विदयार्थी सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.
प्रारंभी मान्यरांच्या हस्ते कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परीचय विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी करुन दिला.विदयालयांचे उपमुख्याध्यापक रवि पाटील यांनी कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या जीवन कार्याचा आलेख स्पष्ट केला.
डाॕ.संदीप देवरे यांनी विदयार्थीना मार्गदर्शन करतांना खडतर परीश्रमा शिवाय यश मिळत नाही हे स्पष्ट करुन समाजात आपले स्थान निर्माण करुन परत शाळेत पाहुणे म्हणून शाळेत या असे सुचवले.
या प्रसंगी एस.एस.सी.परीक्षेत व चित्रकला स्पर्धात यश मिळविलेल्या विद्यार्थींचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गुण गौरव करण्यात आला. माजी निवृत्त मुख्याध्यापक आर.डी.गवळी,माजी उपमुख्याध्यापक कांबळे डी.एम.माजी पर्यवेक्षक एस.ए.इनामदार यांचा शाल व श्रीफळ देवुन सन्मान करण्यात आला.
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे ,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दीलीप कुमार अजमेरे यांनी उपस्थित विदयार्थी,शिक्षकांना मार्गदर्शन केले.विद्यालयांचे क्रीडा शिक्षक श्री.डी.व्हि.विरकर यांनी कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या वरील रचलेल्या कवितेचे वाचन केले.या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन सौ.एस.ए.अजमेरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार एस.डी.गोरे यांनी मानले आहे.