जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या ठिकाणी जंगलीबाबा यात्रा महोत्सव !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत कासली रेल्वे चौकी (गेट) जवळ असलेल्या श्री जालिंदरनाथ (जंगलीबाबा) यांचा यात्रा उत्सव उद्या सोमवार दि.०९ मार्च रोजी सकाळी ९.३० ते १२.३० वाजता विविध कार्यक्रमांनी संपन्न होत असून त्यावेळी समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे जाहिर हरी किर्तन होणार आहे.

श्री जालिंदरनाथ (जंगलीबाबा)

जालिंदरनाथ हे अंतरिक्षनारायणाचा अवतार मानले जातात.एका पौराणिक कथेनुसार,यज्ञकुंडातून ऋषीमुनींना त्यांच्या प्रकटीकरणाची कथा सांगितली जाते.मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथांच्या परंपरेतील महान नाथयोगी आहेत.नवनाथांमध्ये त्यांची गणना ५ व्या किंवा काही ठिकाणी ४ थ्या स्थानावर केली जाते.

   चैतन्य जालिंदरनाथ महाराज हे नवनाथांपैकी एक प्रमुख,जागृत आणि सिद्ध नाथयोगी आहेत.त्यांना अंतरिक्षनारायणाचा अवतार मानले जाते.ते कानिफनाथ महाराजांचे गुरू असून हठयोग व शाबरी विद्येत निपुण होते.बीड जिल्ह्यातील रायमोह जवळचे येवलवाडी येथे त्यांची संजीवन समाधी असून,ते नवनाथभक्तीसारात प्रमुख स्थानावर आहेत.

ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर)

   जालिंदरनाथ हे अंतरिक्षनारायणाचा अवतार मानले जातात.एका पौराणिक कथेनुसार,यज्ञकुंडातून ऋषीमुनींना त्यांच्या प्रकटीकरणाची कथा सांगितली जाते.मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथांच्या परंपरेतील महान नाथयोगी आहेत.नवनाथांमध्ये त्यांची गणना ५ व्या किंवा काही ठिकाणी ४ थ्या स्थानावर केली जाते.जालिंदरनाथ हे कानिफनाथ महाराजांचे गुरु होते.ते हठयोग आणि शाबरी विद्येचे ज्ञाते होते.त्यांच्या कृपेने सर्व कार्यसिद्धी होते,अशी भक्तांची धारणा आहे.त्यांचे संवत्सर,जवळके आणि परिसरात वावर होता अशी भाविकांची श्रद्धा आहे.त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी यात्रा भरते.त्यासाठी या यात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे.तरी संवत्सर,लक्ष्मणवाडी,कासली रेल्वे चौकी (गेट) जवळ संवत्सर,लक्ष्मणवाडी,दहेगांव बोलका परिसरातील भाविकांनी किर्तनाचा,देवदर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावाअसे आवाहन श्री जालिंदरनाथ (जंगलीबाबा) देवस्थान यात्रा समितीने शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close