गुन्हे विषयक
दुचाकीचा अपघात,एक जण गंभीर जखमी,दुचाकीस्वार फरार!

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर लक्ष्मणवाडी येथील रहिवासी असलेले इसम भागा रावजी जाधव (वय-७५) यांचा आज दुपारी २.४० वाजता जखमी हे दशरथवाडीहून लक्ष्मणवाडीला घरी येत असताना त्यांना समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहे.त्यांच्यावर कोपरगावनजीक आलेल्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती हाती आली आहे.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,जखमी इसम भागा जाधव हे संवत्सर गावातून आज दुपारी २.४० वाजेच्या सुमारास सलून दुकानातून आपले काम आटोपून आपल्या घरी जात असताना त्यांना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली आहे.त्यात त्यांचा डावा पाय घोट्याच्यावर मोडला असल्याची माहिती हाती आली आहे.तर उजवा हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कोपरगाव येथील खाजगी एका रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान घटनेनंतर संशयित आरोपी इसम आपली दुचाकी घेऊन फरार झाला आहे.या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.मात्र अपघातानंतर मदतीस आलेल्या ग्रामस्थानी सदर अपघातग्रस्त दुचाकीची छायाचित्रे काढली असून ती सामाजिक संकेतस्थळांवर प्रसारित झाले आहेत.त्यामुळे सदर दुचाकी बाहेरच्या तालुक्यातील असल्याची माहिती हाती आली आहे त्यामुळे सदर दुचाकीला शोधण्याचे कोपरगाव शहर पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.



