धार्मिक
श्री क्षेत्र ताहाराबाद पायी दिंडीचे…या दिवशी आयोजन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र शहापूर येथील हनुमान महाराज मंदिर ते राहुरी तालुक्यातील श्री क्षेत्र ताहाराबाद येथील संत महिपती महाराज येथील समाधी मंदिर या दरम्यान गुरुवार दि.११ जुलै सकाळी पायी दिंडीचे आयोजन केले असल्याची माहिती शहापूर येथील आयोजकांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.या दिंडीचे भाविकांनी स्वागत केले आहे.
संत साहित्यातील अभ्यासकांच्या लेखी संत महिपती महाराजांच्या रचनेला विशेष स्थान आहे.त्यांचे जन्मगाव हे राहुरी तालुक्यातील क्षेत्र ताहाराबाद या ठिकाणी असून या ठिकाणी अजूनही बरेच साहित्य अप्रकाशित आहे.मात्र त्या साहित्याचा अभ्यास करणारे व अप्रकाशित पैलू जगासमोर आणणाऱ्या विभूती अद्याप येणे बाकी आहे.तरीही या संतांचे व्यक्तिमत्व मुळीच कमी लेखता येणार नाही.त्या समाधीवर डोके टेकविण्यासाठी राज्याच्या नव्हे तर विविध देशातून अभ्यासू आणि चिकित्सक व विविध दिंड्या राज्यभरातून येत असतात हे वळोवेळी सिद्ध झाले आहे.
श्रेष्ठ संत कवी महिपती यांनी महाराष्ट्रावर संतचरित्र लेखनाने मोठे उपकार करून ठेवले आहेत.त्यांचे ऋण सतत शिरी वहावे असे आहे.या असंख्यात ओवी लेखनात सदाचार,नीती,धर्म,भक्ति याचा विचार आहे.भक्तिविजय सारख्या त्यांच्या ग्रंथाचे सामुदायिक वाचन खेडोपाडी प्रतिवर्षी होत आहे.यात मागील दिडशे वर्षापासुन खंड नाही.संत महिपती महाराज यांनी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील अनेक संतांचा काव्यमय परिचय ‘भक्त विजय’ व `संतलीलामृत’ या ग्रंथांत शब्दबद्ध केला आहे.संत साहित्यातील अभ्यासकांच्या लेखी संत महिपती महाराजांच्या रचनेला विशेष स्थान आहे.त्यांचे जन्मगाव हे राहुरी तालुक्यातील क्षेत्र ताहाराबाद या ठिकाणी असून या ठिकाणी अजूनही बरेच साहित्य अप्रकाशित आहे.मात्र त्या साहित्याचा अभ्यास करणारे व अप्रकाशित पैलू जगासमोर आणणाऱ्या विभूती अद्याप येणे बाकी आहे.तरीही या संतांचे व्यक्तिमत्व मुळीच कमी लेखता येणार नाही.त्या समाधीवर डोके टेकविण्यासाठी राज्याच्या नव्हे तर विविध देशातून अभ्यासू आणि चिकित्सक येत असतात हे वळोवेळी सिद्ध झाले आहे.गत ३०० वर्षांपासून या ठिकाणी ज्यांच्या भेटीसाठी पंढरीचा पांडुरंग परमात्मा श्री क्षेत्र ताहाराबाद या ठिकाणी सात दिवस वास्तव्य करून राहतात असा भाविकांची श्रद्धा आहे.
दरम्यान श्री क्षेत्र ताहाराबाद या ठिकाणी संत कवी महिपती महाराज देवस्थानच्या वतीने यावर्षी विविध संत महात्म्यांच्या उपस्थितीत ‘पांडुरंग महोत्सव’ संपन्न होत असतो.त्यासाठी विविध ठिकाणाहून दिंड्या आणि भाविकांची मोठी मांदियाळी येत असते.या वर्षी या पांडुरंग उत्सव मंगळवार दि.११ जुलै ते सोमवार दि.१७ जुलै रोजी संपन्न होत आहे.शनिवार दि.१५ जुलै रोजी श्री क्षेत्र सराला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांचे जाहीर हरी कीर्तन संपन्न होत आहे.तर सोमवार दि.१७ जुलै रोजी सकाळी ०६ वाजता पाऊलघडीचा कार्यक्रम संपन्न होत आहे.
त्यासाठी राज्यातून विविध ठिकाणाहून या ठिकाणी भाविक अनेक दिंड्या घेऊन अवतीर्ण होत असतात.अशीच एक दिंडी शहापूर ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी कोपरगाव तालुक्यातील क्षेत्र शहापूर या ठिकाणाहून जात असते.ती दिंडीचे यंदा मंगळवार दि.११ जुलै रोजी रामनाथ पाचोरे यांच्या हस्ते पूजन होऊन प्रस्थान होत आहे.सदर दिंडी क्षेत्र ताहाराबाद या ठिकाणी शनिवार दि.१५ जुलै रोजी पोहचणार असून त्या ठिकाणी इंग्लिश स्कूल येथे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
दरम्यान पहिला मुक्काम हा आडगाव बु.येथे श्री कृष्ण मंदिर येथे होणार आहे.तर दुसरा मुक्काम हा हनुमंतगाव येथे हनुमान मंदीर या ठिकाणी होणार आहे.तर तिसरा मुक्काम हा राहुरी तालुक्यातील वरशिंदे या ठिकाणी होणार आहे.तर चौथा मुक्काम हा श्री क्षेत्र ताहाराबाद या ठिकाणी माजी सरपंच मधुकर कृष्णाजी उदावंत यांचे निवासस्थांनी होणार आहे.
दरम्यान सदरच्या दिंडीसाठी विविध भाविक आणि विविध गावचे रहिवासी यांचे सहकार्य लाभणार असून ते भोजन व चहा-पाण्याची व्यवस्था करणार आहे.तर वाहन व्यवस्था गोरख घारे,कैलास वर्पे,विणेकरी जगन्नाथ शिंदे,उत्तम महाराज मुंगसे,विठ्ठल डांगे,लक्ष्मण पाचोरे,रवींद्र डांगे,पोपट महाराज मुंगसे,कार्तिक डांगे आदींचे सहकार्य लाभले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.दिंडीसाठी भाविकांनी सखाराम मार्तंड घारे यांचे मो.क्रं.९६८९६३२८११,खंडेराव पाचोरे-९६८९५७५१४३ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.