धार्मिक
श्री क्षेत्र भऊर ते पुणतांबा दिंडी सोहळा आयोजन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र भऊर येथील रोकडेश्वर महाराज मंदिर ते राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील श्री चांगदेव महाराज यांचे समाधी मंदिर या दरम्यान गुरुवार दि.१३ जुलै सकाळी ०८ वाजता पायी दिंडीचे आयोजन केले असल्याची माहिती ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.या दिंडीचे भाविकांनी स्वागत केले आहे.
चांगदेव हे योगमार्गातील अधिकारी पुरुष होते.योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे.यांच्या गुरूचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात.काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप).तापी-पूर्णा नदीच्या तीरावर चांगदेव या गावाजवळच्या वनात डोळे बंद करून तपश्चर्या करीतच हे योगी झाले होते.त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांना चांगदेव म्हणू लागले.योगी चंगदेव महाराज यांच्या समाधी स्थळी लहान आषाढी एकादशीस श्री क्षेत्र पुणतांबा येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते.
दरम्यान त्या निमित्ताने नगर,नाशिक छ.संभाजी नगर आदी ठिकाणाहून अनेक वैष्णवांच्या दिंड्या श्री शेकत्र पुणतांबा या ठिकाणी पायी चालत येत असतात.त्याच ठिकाणी श्री क्षेत्र सराला बेट येथील संत सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या मोठ्या सप्ताहाची अधिकृत घोषणा होत असते.या वर्षीही ती होणार आहे.त्या साठी मोठया प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असते.त्या निमित्ताने राज्यातून विविध ठिकाणाहून दिंड्या हजर होत असतात.अशीच एक दिंडी श्री शॆत्र पंढरपूर नंतर ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र भऊर या ठिकाणाहून सुरु केली आहे.या वर्षीं सदर दिंडीचे प्रस्थान गुरुवार दि.१३ जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.तरी या दिंडी सोहळ्याचा भाऊर आणि परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संजय महाराज जगताप यांनी शेवटी केले आहे.