जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

‘पीक उत्पादन खर्च पाठवून द्या’-…या शेतकरी नेत्याचे आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

शेतीमालाच्या उत्पादन खर्चा संदर्भात भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने कृषी मूल्य आयोगाची बैठक दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी दिल्ली येथे आयोजित केली आहे.या बैठकीत भारतीय किसान संघ-परिसंघ ‘सिफा’च्यावतीने आपल्याला आपण शेतीत घेत असलेल्या पिकाचा उत्पादन खर्च कृषी मूल्य आयोगास देण्याचा मांनस असून याबाबत शेतकऱ्यांनी आपण करत असलेल्या वेगवेगळ्या पिकाचा प्रती क्विंटल उत्पादन खर्च पाठवून दयावा असे आवाहन सिफचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकानंव्ये केले आहे.

शेतकऱ्यांच्या बाजूनेही या किंमतींचा विचार करावा लागतो.जर बाजारात शेती-उत्पादनास अगदी कमी किंमत मिळाली,तर शेतकऱ्यांच्या हातात फारसा नफा अगर वाढावा राहात नाही,अथवा या व्यवहारात त्यांचा तोटाही होऊ शकतो.शेतमालाच्या किंमती उच्च पातळीला गेल्या,तर शेतकऱ्यांचा फायदा होईल; पण गाहकांना या वाढीव किंमतीचा फटकाही बसू शकतो.त्यामुळे दोन्ही बाजूंचा सरकारला विचार करावा लागतो.मात्र सरकार फुकट खाणाऱ्या तोंडाचा जास्त विचार करत असल्याचे वारंवार उघड होत आहे हि चिंतेची बाब आहे.

शेतमालाच्या बाजाराइतकी अनिश्चितता अन्य उत्पादनांमध्ये नाही.मुळात,शेती निसर्गावर अवलंबून आहे आणि त्यात त्याच्या बाजाराची अनिश्चितता अधिक म्हणून एकूण शेती व्यवसाय आतबट्याचा होऊन बसला आहे,म्हणून शेती करणे कोणी सोडून देणार नाही आणि तसे करणेही शक्य नाही.भारतात अजून ५५ ट्क्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या शेतीवरच अवलंबून आहे.परंतु या एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात सकल घरेलू उत्पादनातील शेतीचा वाटा १३.७ टक्के इतकाच आहे.म्हणजेच या व्यवसायावर आधारित लोक अन्य लोंकांपेक्षा गरीब आहेत हे उघड आहे.शेतकरी,शेती व्यवसाय आणि त्यातल्या त्यात कृषिमालाच्या बाजार व्यवस्थापनाच्या या प्रश्नांची मांडणी करताना,ती आत्यंतिक डाव्या विंचारसणीतून केली जातें.त्यामुळे शेतकरी आणि शेती व्यवसाय आज आतबट्याचा झाला आहे.कृषी मूल्य आयोग हा चेष्टेचा विषय ठरला आहे.यावर शेतकऱ्यांचे राजकीय पक्षाचे नेते शेतकऱ्यांची मते घेऊन ज्या सभागृहात जातात त्यावर ‘च’कार शब्द बोलायला तयार दिसत नाही हे विशेष ! त्यामुळे शेतमालाच्या किंमती हा अतिशय संवेदनशील विषय आहे.अन्नधान्य,तेलबिया,ताग,कापूस इ.कृषिउत्पादने कोणत्या किंमतीला मिळतात,यावर लोकांचे वास्तव उत्पन्न अवलंबून असते.या वस्तू महाग झाल्या,तर लोकांचे राहणीमान खर्चिक बनत जाते.कापूस,ताग,ऊस असा कच्च माल महाग झाल्यास त्यानुसार कापड,साखर अशी जी औदयोगिक उत्पादने तयार होतात,त्यांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे या प्रश्नाकडे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व सिफाचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी लक्षवेधून घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की,”तरी शेतकऱ्यांनी आपण करत असलेल्या वेगवेगळ्या पिकाचा प्रती क्विंटल उत्पादन खर्च ९४२२४०६१८८ व rdadapatil@gmail.com या ठिकाणी दि.२० फेब्रुवारीपर्यंत पाठवून द्यावे म्हणजे आपणास मिळत असलेला उत्पादन खर्च अधिक मिळण्यास मदत होईल व शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसून जाईल असे आवाहन भारतीय किसान संघ-परिसंघ राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close