जाहिरात-9423439946
शैक्षणिक

रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


कोपरगाव-(प्रतिनिधी)


पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल-२०२३ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाइन जाहीर झाला असून चासनळी येथील के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती महाविद्यालययाने दिली आहे.


इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून.विज्ञान शाखेतून कुमारी गायत्री भाऊसाहेब शिंदे (७२.६७%) ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तसेच गायत्री राधाकिसन पारखे (७१%) ही विद्यार्थिनी द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे तर  रितेश प्रकाश चांदगुडे (६८.१७) हा तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.


वाणिज्य विभागातून निखिल राजेंद्र सानप (८३%) हा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून अंजली सुनील गाढे (८२.८३%) द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे तर राधिका संतोष घुगे (८२.३३%) ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे सचिव संजीव कुलकर्णी,चंद्रशेखर कुलकर्णी,संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ.बी.एस. यादव,पंडितराव चांदगुडे,संजय चांदगुडे,सचिन चांदगुडे,मनिष गाडे,रामभाऊ गाढे,डॉ.विकास जामदार,महाविद्यालयाचे प्राचार्य एन.जी.बारे आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close