गुन्हे विषयक
उसाचे शेज तोडण्याच्या कारणावरून हाणामारी,कोपरगावात गुन्ह्याची नोंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मूळ चाळीसगाव तालुक्यातील पिंपळखेड येथील रहिवासी असलेल्या वर्तमानात कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारात भुसानगर येथे तात्पुरते रहिवासी असलेला ऊस तोडणी मजुरास,आपले उसाचे शेज तोडण्याच्या कारणावरून त्यास आरोपी एकनाथ दादा राठोड,किरण एकनाथ राठोड,राजेंद्र कारभारी पवार,रवींद्र राजेंद्र पवार आदींनी उसाचे शेज का पूर्ण करून देत नाही म्हणून काठी,लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी राम रतन जाधव (वय-१९) यांने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दि.१६ जानेवारी रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास कोळपेवाडी येथील भुसानगर येथील ऊस तोडणी अड्ड्यावर फिर्यादी असताना आरोपी एकनाथ राठोड व त्याच्या अन्य तीन साथीदारांनी त्यास,”तू उसाचे शेज का तोडत नाही म्हणून त्याच्याशी हुज्जत घातली असून त्यातून त्यांचा पारा सातव्या अस्मानात पोहचला होता.त्यातून त्यांनी फिर्यादी,त्याची आई,भाऊ यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी राम जाधव हा ऊस तोडणी मजूर असून तो ठेकेदार एकनाथ राठोड याकडे ऊस तोडणी मजूर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्यात ऊसतोडणी मजूर म्हणून काम करत आहे.दि.१६ जानेवारी रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास कोळपेवाडी येथील भुसानगर येथील ऊस तोडणी अड्ड्यावर तो असताना आरोपी एकनाथ राठोड व त्याच्या अन्य तीन साथीदारांनी त्यास,”तू उसाचे शेज का तोडत नाही म्हणून त्याच्याशी हुज्जत घातली असून त्यातून त्यांचा पारा सातव्या अस्मानात पोहचला होता.त्यातून त्यांनी फिर्यादी,त्याची आई,भाऊ यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
त्याबाबत कोळपेवाडी येथील तात्पुरते रहिवासी असलेला फिर्यादी राम जाधव याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.क्रं.४०/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे चारही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.राजू कोकाटे हे करत आहेत.