जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यातील ठेवीदारांच्या ४३.५३ लाखांच्या ठेवी गायब,शिर्डीत गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

श्री शनि छत्र अर्बन मल्टीनिधी लिमिटेड जवळके शाखा बँकेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष व संचालक यांनी संगणमत करून ठेवीदार यांचे पैसे हडप करण्याचे उद्देशाने विश्वासघात करून सुमारे ४३ लाख ५३ हजार एवढ्या रकमेची आर्थिक फसवणूक केली असल्याची फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून त्यामुळे या निधी कंपनीच्या ठेवीदारांमध्ये, खातेदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

“जवळके येथील शनिछत्र निधी कंपनीत ठेवीदार सुनील बन्सी चिने,नंदकिशोर बाजीराव चासकर,ज्ञानदेव विठ्ठल गुंजाळ,ज्योतिष शरद निरगुडे,ऋषिकेश रावसाहेब काळे,यांच्याही ठेवी आहेत.आपण व अन्य ठेवीदारांनी अनेकदा संपर्क करूनही देखील या शनिछत्र निधी कंपनीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व संचालक पैसे देण्यास टाळाटाळ करत असून कोणताही प्रतिसाद देत नाहीत.वारंवार मागणी करूनही त्यांनी अद्याप पर्यंत आमचे पैसे परत दिलेले नाहीत.त्यामुळे आमची आर्थिक फसवणूक झाली असून माझे सुमारे ३८ लाख ७५ हजार ५०० तर इतर ठेवीदारांची रक्कम मिळून ४३ लाख ५३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे”-अनिता कुठे,ठेवीदार.

यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेले सविस्तर वृत्त असे की,”बहादरपुर तालुका कोपरगाव येथील अनिता रवींद्र कुटे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आपण कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथे रहिवासी असून जवळके येथील शनिछत्र अर्बन जवळके मल्टी निधी लिमिटेड धोंडेवाडी येथे सध्या सहाय्यक शाखा प्रबंधक या पदावर काम करत आहे.माझे पति रवींद्र कुटे हे कोरोना मुळे मयत झाले.त्यानंतर मॅक्स लाइफ टर्म इन्शुरन्स मेडिक्लेम इत्यादी साधारण लाख रुपये नॉमिनी म्हणून माझ्या बँक ऑफ महाराष्ट्र या खात्यात प्राप्त झाली होती.आपण काम करत असलेल्या शनिछत्र अर्बन मल्टी निधी लिमिटेड जवळके या खाजगी निधी कंपनीचे अध्यक्ष नितीन विलास शिंदे व चेअरमन अभिजीत विश्वनाथ रासकर व संचालक मंडळाचे संचालक रवींद्र बाबुराव गोरडे,शिवाजी निवृत्ती भोंगळ,भूषण रोहिदास गरुडकर,अरुण चिंतामणी,अमोल प्रवीण पाचरणे असे सदस्य म्हणून आहेत.
नितीन विलास शिंदे व उपाध्यक्ष अभिजीत विश्वनाथ रासकर यांनी मला नोव्हेंबर मध्ये त्यांच्या निधी कंपनीमध्ये वर्षभरासाठी काही रक्कम मुदत ठेव करा,तुम्हास अधिक टक्के व्याज देऊ तसेच मासिक ठेवी करता अधिक टक्के दराने व्याज देऊ असे आश्वासन दिले होते.सदर वेळी त्यांनी मला सदर मुदत ठेव आवडली नाही तर दोन महिन्यानंतर सर्व मुदत ठेव रक्कम पूर्णपणे काढू शकता असे आश्वासन दिले होते.त्यावेळी मला हा व्याजदर चांगला वाटल्याने माझी मुलगी अन्विता रवींद्र कुटे हिचे नावाने बचत खात्यामध्ये काही रक्कम मुदत ठेव ठेवली तसेच माझा पुतण्या सुमित अशोक कुटे व आदेश अशोक कुटे यांच्या नावाने डेली कलेक्शन तसेच माझ्या नावाने सेविंग अकाउंट मध्ये व मुदत ठेव मध्येही काही रक्कम जमा केली.त्यानंतर माझे पतीचे मध्यम श्राद्ध असल्यामुळे मला पैशाची गरज होती.त्यामुळे या ठेवीतून काही पैसे द्यावे.म्हणून आपण संस्थेचे अध्यक्ष यांच्याकडे आपल्या मुदत ठेवींचा पैशाची मागणी केली असता पुढील महिन्यात पैसे देवू असे त्यांनी आश्वासन दिले होते.त्यानंतर ही त्यांनी वारंवार आश्वासन देऊनही पैसे दिले नाही.मात्र नंतर त्यांचे कार्यालयात येण्याचे बंद झाले.त्यानंतर या कंपनीचे व्यवस्थापक पाडेकर हे मला घेऊन त्यांच्या घरी गेले मात्र ते घरीही भेटले नाहीत.त्याचप्रमाणे या निधी कंपनीत ठेवीदार सुनील बन्सी चिने, नंदकिशोर बाजीराव चासकर,ज्ञानदेव विठ्ठल गुंजाळ,ज्योतिष शरद निरगुडे,ऋषिकेश रावसाहेब काळे,यांच्याही ठेवी आहेत. माझे व इतर ठेवीदारांनी अनेकदा संपर्क करूनही देखील या शनिछत्र निधी कंपनीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व संचालक पैसे देण्यास टाळाटाळ करत असून कोणताही प्रतिसाद देत नाहीत.वारंवार मागणी करूनही त्यांनी अद्याप पर्यंत आमचे पैसे परत दिलेले नाहीत.वेळोवेळी उडवाउडवीचे उत्तर ते देत आहेत.त्यामुळे आमची आर्थिक फसवणूक झाली असून माझे सुमारे ३८ लाख ७५ हजार ५०० तर इतर ठेवीदारांची रक्कम मिळून ४३ लाख ५३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक शनिछत्र अर्बन जवळके मल्टीनिधी लिमिटेड धोंदेवाडी,जवळके तालुका कोपरगावचे अध्यक्ष नितीन विलास शिंदे,उपाध्यक्ष अभिजीत विश्वनाथ रासकर व संचालक रवींद्र बाबुराव गोरडे अ.नगर यांनी केली असून त्यांच्या विरोधात ठेवीदार अनिता रवींद्र कुटे यांनी वरील आशयाची फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यामुळे जवळके आणि परिसरात ठेवीदारांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदणी क्रं.-१९-२०२३ नुसार भा.द.वि. कलम १२० बी.३४/ ४०६ /४२०/ ५०६/ त्याच प्रमाणे महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हित संरक्षण अधिनियम ३ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासंदर्भात शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close