जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात ट्रॅक्टरची चोरी,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत कर्मवीर सहकारी साखर कारखाना उसाच्या जुन्या बैलगाडी यार्डात उभा करून ठेवलेला एक लाख रुपये किमतीचा हिरव्या रंगाचा जॉन डियर ट्रॅक्टर अज्ञातच चोरट्याने फिर्यादीच्या संमितीशिवाय चोरून नेला आहे.फिर्यादी अंकुश लक्ष्मण माने (वय-२७) रा.पुनर्वसन सावरगाव ता.कळंब जिल्हा उस्मानाबाद ह.रा.कुंभारी या चालकाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे ट्रॅकॅटर मालकांत खळबळ उडाली आहे.

ऊस कारखाना सुरु झाल्यापासून ते गळीत हंगाम संपेपर्यंत ऊस तोडणी कामगारांचे काम अव्याहतपणे सुरु असते.त्यात ऊन,वारा,थंडी आदींनी फार परिणाम होत नाही.मात्र काही वेळा त्यांनाच चोरांचा तडाखा सहन करावा लागतो अशीच घटना नुकतीच कोळपेवाडी येथील बैलगाडी तळावर घडली असून फिर्यादी अंकुश माने यांचा हिरव्या रंगाचा जॉन डियर हा सुमारे एक लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर काही अज्ञातच चोरट्यांनी पळवून नेला आहे.

वर्तमानात काळात कोपरगाव तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडीचा हंगाम जोरात सुरु असून त्यासाठी मराठवाडा,खान्देश आदी ठिकाणाहून अनेक ऊस तोडणी मजूर तालुक्यात आपल्या पोटासाठी आले आहे.त्यांच्याकडे काहींकडे ट्रॅक्टर तर काहींकडे बैलगाड्या आहे.भल्या पहाटे हि मंडळी ऊस तोडणीसाठी बाहेर पडतात व सायंकाळच्या सुमारास कारखान्यावर आपला ऊस तोडून घेऊन येतात.रात्री ते कारखान्यानाजीक असलेल्या बैलगाडी तळावर मुक्कामास राहतात.हा त्यांचा दिनक्रम कारखाना सुरु झाल्यापासून ते गळीत हंगाम संपेपर्यंत सुरु असतो.त्यात ऊन,वारा,थंडी आदींनी फार परिणाम होत नाही.मात्र काही वेळा त्यांनाच चोरांचा तडाखा सहन करावा लागतो अशीच घटना नुकतीच कोळपेवाडी येथील बैलगाडी तळावर घडली असून फिर्यादी अंकुश माने यांचा हिरव्या रंगाचा जॉन डियर हा सुमारे एक लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर काही अज्ञातच चोरट्यांनी दि.२१ फेब्रुवारी रोजी रात्री ८.४५ ते ०९ वाजेच्या सुमारास लांबवला आहे.त्यांनी शोध घेऊनही तो मिळून आला नाही अखेर त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.५७/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजू चव्हाण हे करीत आहेत.

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत कर्मवीर सहकारी साखर कारखाना उसाच्या जुन्या बैलगाडी यार्डात उभा करून ठेवलेला एक लाख रुपये किमतीचा हिरव्या रंगाचा जॉन डियर ट्रॅक्टर अज्ञातच चोरट्याने फिर्यादीच्या संमितीशिवाय चोरून नेला आहे.फिर्यादी अंकुश लक्ष्मण माने (वय-२७) रा.पुनर्वसन सावरगाव ता.कळंब जिल्हा उस्मानाबाद ह.रा.कुंभारी या चालकाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे ट्रॅकॅटर मालकांत खळबळ उडाली आहे.
वर्तमानात काळात कोपरगाव तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडीचा हंगाम जोरात सुरु असून त्यासाठी मराठवाडा,खान्देश आदी ठिकाणाहून अनेक ऊस तोडणी मजूर तालुक्यात आपल्या पोटासाठी आले आहे.त्यांच्याकडे काहींकडे ट्रॅक्टर तर काहींकडे बैलगाड्या आहे.भल्या पहाटे हि मंडळी ऊस तोडणीसाठी बाहेर पडतात व सायंकाळच्या सुमारास कारखान्यावर आपला ऊस तोडून घेऊन येतात.रात्री ते बैलगाडी तळावर मुक्कामास राहतात.हा त्यांचा दिनक्रम कारखाना सुरु झाल्यापासून ते गळीत हंगाम संपेपर्यंत सुरु असतो.त्यात ऊन,वारा,थंडी आदींनी फार परिणाम होत नाही.मात्र काही वेळा त्यांनाच चोरांचा तडाखा सहन करावा लागतो अशीच घटना नुकतीच कोळपेवाडी येथील बैलगाडी तळावर घडली असून फिर्यादी अंकुश माने यांचा हिरव्या रंगाचा जॉन डियर हा सुमारे एक लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर काही अज्ञातच चोरट्यांनी दि.२१ फेब्रुवारी रोजी रात्री ८.४५ ते ०९ वाजेच्या सुमारास लांबवला आहे.त्यांनी शोध घेऊनही तो मिळून आला नाही अखेर त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.५७/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजू चव्हाण हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close