गुन्हे विषयक
उसने पैसे मागितले,कोपरगावात गजाने मारहाण,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर उपनगरात रहिवासी असलेल्या फिर्यादीच्या वडिलांकडे आरोपी युनूस कलाम शेख याने उसने पैसे मागितले व “तू ,ते का देत नाही”असा जाबसाल केला असता फिर्यादी हा वडिलांना आणण्यासाठी गेला असता आरोपीने लोखंडी गज आणून त्याने फिर्यादिस डोक्यात व पाठीत मारून गंभीर दुखापत केली असल्याचा गुन्हा फिर्यादी रिझवान इलियास शेख (वय-१८) याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
फिर्यादीच्या वडिलांनी आरोपी युनूस शेख यांचेकडून उसनवारीने रुपये ४७ हजार घेतले होते ते त्याने वेळेत परत केले नाही.ती रक्कम मागण्यासाठी आरोपी युनूस शेख हा शनिवार दि.१३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्याच्या घरी गेला असता व फिर्यादीच्या वडिलांना म्हणाला की,”माझे तुला उसनवारीने दिलेले ४७ हजार रुपये तू परत का दिले नाही” त्यावरून दोघात शाब्दिक चकमक झाली.त्यातून फिर्यादीस आरोपीने टॉमीने मारहाण करून जखमी केले आहे.
कोपरगाव शहराच्या पश्चिमेस साधारण दीड कि.मी.अंतरावर असलेल्या लक्ष्मीनगर येथे पाण्याच्या टाकीजवळ फिर्यादी रिझवान शेख तर आरोपी युनूस शेख हा गल्ली क्रं.१ येथे राहतो.फिर्यादीच्या वडिलांनी आरोपी युनूस शेख यांचेकडून उसनवारीने रुपये ४७ हजार घेतले होते ते त्याने वेळेत परत केले नाही.ती रक्कम मागण्यासाठी आरोपी युनूस शेख हा शनिवार दि.१३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्याच्या घरी गेला असता व फिर्यादीच्या वडिलांना म्हणाला की,”माझे तुला उसनवारीने दिलेले ४७ हजार रुपये तू परत का दिले नाही” त्यावरून दोघात शाब्दिक चकमक झाली.त्या भांडणात वाढ होऊ नये म्हणून फिर्यादी हा त्याच्या वडिलांना आणण्यास गेला असता आरोपी फिर्यादी रिझवान शेख याने फिर्यदिस शिवीगाळ चालू केली.त्यावर फिर्यादी हा त्यास म्हणाला की,”तुम्ही विनाकारण शिवीगाळ का करता ? असे म्हणल्याचा आरोपीस राग आला व त्याने त्याचे राहते घरी पळत जाऊन लोखंडी टॉमी आणली व फिर्यादीचे डोक्यात दोन वेळेस तर पाठीवर मारली.त्यातून फिर्यादीच्या डोक्यास सहा टाके पडून गंभिर जखमी झाला आहे.
दरम्यान आरोपीने तू परत इकडे आला तर तुला जिवंत ठार मारील अशी धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी हा उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक देसले व सहाय्यक फौजदार पवार यांनी भेट दिली असून घटनेचे गांभीर्य समजून घेतले आहे.व आरोपीला अटक केली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३३८/२०२१ भा.द.वि.कलम ३२६,३२४,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपासपोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करीत आहेत.