जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दुचाकीची चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील कोपरगाव नगरपरिषदेच्या पाणी साठवण तलावाजवळ दि.०८ नोव्हेंबर रोजी दुपारी ०३.४५ वाजता उभी करून ठेवलेली आपली ३५ हजार रुपये किमतीची ‘बजाज प्लॅटिना’ (क्रं.एम.एच.१५ एच.एल.४१५८) हि दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद येवला तालुक्यातील अंगुलगाव येथील रहिवासी असलेल्या सोमनाथ तुळशीराम सावंत (वय-४०) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने दुचाकी स्वारात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी यांनी आपली वरील क्रमांकाची व ३५ हजार रुपये किमतीची ‘बजाज प्लॅटिना’ हि दुचाकी कोपरगाव नगरपरिषदेच्या येसगाव शिवारातील पाण्याच्या साठवण तलावाजवळ दि.०८ नोव्हेंबर रोजी दुपारी ०३.४५ वाजता उभी करून ठेवली होती. व ते आपल्या कामास नजीकच्या वस्तीवर गेले असता व परत आले असता त्यांना आपली दुचाकी दुपारी ०३.५५ वाजता आढळली नाही.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी इसम हा येवला तालुक्यातील अंगुलगाव येथील रहिवासी आहे.ते आपल्या काही कामानिमित्त कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात आले होते.व त्यांनी आपली वरील क्रमांकाची व ३५ हजार रुपये किमतीची ‘बजाज प्लॅटिना’ हि दुचाकी कोपरगाव नगरपरिषदेच्या येसगाव शिवारातील पाण्याच्या साठवण तलावाजवळ दि.०८ नोव्हेंबर रोजी दुपारी ०३.४५ वाजता उभी करून ठेवली होती. व ते आपल्या कामास नजीकच्या वस्तीवर गेले असता आपले काम आटोपून ते पुन्हा आपल्या दुचाकींजवळ आले होते. त्यांनी उभी करून ठेवलेली दुचाकी त्यांना दुपारी ०३.५५ वाजता आढळली नाही.त्यांनी आपल्या दुचाकीचा नजीकच्या नागरिकांकडे शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३८३/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.एम.आंधळे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close