जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कायद्याच्या राखणदारांविरूध्दच २० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   गावातील पोलिस पाटलाची त्यांच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था राखण्याची व गुन्ह्यांची माहिती पोलिसांना देण्याची असताना कोपरगाव तालुक्यातील एक मासलेवाईक घटना समोर आली असून पोलिस पाटलानेच जमीन खरेदीचा खोटा दस्त करून देत जवळपास २० लाखांची फसवणूक केली असल्याचे उघड झाल्याने फसवणूक झालेल्या कोपरगाव येथील एक रेशन दुकानदार किरण सिताराम डांगे (वय-४०) यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात आरोपी पोलिस पाटील दगु मोहन गुडघे (वय -५५) यांचे विरूध्द गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

सोनवाडी येथील पोलिस पाटील दगु मोहन गुडघे याने जमीन विकण्याच्या बहाण्याने चांदेकसारे हद्दीतील गट क्रमांक ८९/२ मधील ०.२० आर.क्षेत्र माझे आधी २०१७ साली निवारा हौसिंग सोसायटी येथील रहिवासी शैलजा वाघमारे यांना कोपरगाव येथील दुय्यम निंबधक यांचे कार्यालयात बनावट कायम खरेदी खत करून दिले होते.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

   याबाबतचे सविस्तर वृत असे की,”गावातील कामगार पोलीस पाटलाची त्यांच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था राखण्याची व गुन्हेगारांची माहिती पोलिसांना देणे,विनापरवाना शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध करणे आणि नैसर्गिक आपत्ती किंवा रोगराईची माहिती वरिष्ठांना देणे ही प्रमुख कामे आहेत ते गावकऱ्यांच्या मदतीने शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करतात.त्यामुळे त्याला गावात विशेष प्रतिष्ठा असते.त्याच्या फंदात शक्यतो कोणी पडताना दिसत नाही.म्हणजेच गावातील कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिस पाटलाचे असताना कोपरगाव तालुक्यात एक वेगळाच नमुना समोर आला आहे.त्यांनी जमीन विकण्याच्या बहाण्याने चांदेकसारे हद्दीतील गट क्रमांक ८९/२ मधील ०.२० आर.क्षेत्र माझे आधी २०१७ साली सुमंगल कॉम्प्लेक्स,निवारा हौसिंग सोसायटी येथील रहिवासी शैलजा दुर्गाजी वाघमारे यांना कोपरगाव येथील दुय्यम निंबधक यांचे कार्यालयात कायम खरेदी खत करून दिले होते.याशिवाय त्याच जमिनीचा कोपरगाव येथील किरण डांगे या फिर्यादी इसमास सन-२०२३ मध्ये बिन कब्जाचे साठेखत व जनरल मुखत्यार पत्र लिहून दिले होते.त्याबदल्यात त्याने फिर्यादिकडून रोख १५ लाख रुपयांची रक्कम व ०५ लाखांचा धनादेश लिहून दिला होता.मात्र ज्यावेळी मुदत संपली त्यावेळी आपण सदर आरोपी दगु गुडघे यास सदर जमिनीची खरेदी करून द्यावी असा तगादा लावला असता त्याने वेळकाढूपणा सुरू केला होता.त्यात वारंवारता वाढल्याने आपल्या संशय आला होता.त्यामुळे आपण या आरोपींची आणि जमिनींची त्याच्या गावात जावून चौकशी सुरू केली असता.तेथील काही कर्मचाऱ्यांनी यांच्या लीला आपल्या लक्षात आणून दिल्या होत्या.त्यामुळे आपण त्या दिशेने चौकशी केली असता त्यात तथ्य आढळून आले होते.परिणामी आपली खात्री पटली की आरोपी पोलिस पाटील दगू गुडघे याने आपली फसवणूक केली आहे.म्हणून आपण कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपी दगु गुडघे विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.यापूर्वीही या पोलिस पाटलाविरूध्द मागील आठवड्यात एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे पोलिस पाटील कसा नसावा याचे उदाहरण निर्माण झाले असून याबाबत सोनेवाडी,चांदेकसारे आदी परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

   दरम्यान या प्रकरणी चांदेकसारे येथील घटनास्थळी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व पोलिस उपनिरीक्षक दीपक रोठे यांनी भेट दिली आहे.

   कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात गुन्हा अनुक्रमे नोंद ४५१ /२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ४२०,४६८,४७१ प्रमाणे आरोपीविरुद्ध नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली नूतन पोलिस उपनिरीक्षक रोठे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close