गुन्हे विषयक
अवैध दारूसाठा जप्त,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चास नळी ग्रामपंचायत हद्दीत चासनळी ते कोळपेवाडी रोडलगत असललेल्या हॉटेल निसर्ग च्या शेजारी भिंतीच्या आडोशाला दि.०९ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२.३५ वाजेच्या सुमारास त्याच गावातील आरोपी निलेश ताराचंद ब्राम्हणे यास अवैध रित्या देशी विदेशी दारू विक्री करताना पकडण्यात आले आहे.त्याच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांत खळबळ उडाली आहे.
चासनळी शिवारात एक आरोपी लासलगाव रस्त्याच्या कडेला हॉटेल निसर्ग शेजारी असललेल्या भींतीच्या आडोशाला अवैध रित्या देशी विदेशी दारू विक्री करत आहे.त्यांनी पो.नि.जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांना या ठिकाणी पाठविले असता त्यात तथ्य आढळून आले आहे.त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता सदर जागी आरोपी निलेश ब्राम्हणे हा अवैध दारू विक्री करताना आढळून आला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांना गुप्त खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की,चासनळी शिवारात एक आरोपी लासलगाव रस्त्याच्या कडेला हॉटेल निसर्ग शेजारी असललेल्या भींतीच्या आडोशाला अवैध रित्या देशी विदेशी दारू विक्री करत आहे.त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना या ठिकाणी पाठविले असता त्यात तथ्य आढळून आले आहे.त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता सदर जागी आरोपी निलेश ब्राम्हणे हा अवैध दारू विक्री करताना आढळून आला आहे.त्याच्या ताब्यातील ०२ हजार ७७८ रुपये किमतीचा १८० मी.ली.च्या १९ देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.या प्रकरणी फिर्यादी पो.कॉ.युवराज मारुती खुळे यांनी आरोपी ब्राम्हणे यास अटक करून त्याचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३८४/२०२१ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५(ई) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.डी.बोटे हे करीत आहेत.