गुन्हे विषयक
महिलेने घरातच केली आत्महत्या,कोपरगावात अकस्मात मृत्यूची नोंद
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मोर्विस येथील मूळ रहिवासी असलेली मात्र चासनळी येथे व्यवसायानिमित्त डॉक्टर पती बरोबर स्थायिक असलेली महिला जयश्री चंद्रकांत पाटील (वय-३२) हिने नवरा दूध आणण्यासाठी बाहेर गेला असता आपल्या घरातच आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.
आज दि.१३ सप्टेंबर रोजी सकाळी नवरा घरासाठी दूध आणण्यासाठी गेला असता व लहान मुलगी हि बाहेर खेळण्यास गेली असता हि संधी साधून जयश्री पाटील या महिलेने घरातील पंख्याला दोरी बांधून आपली जीवनयात्रा अज्ञात कारणामुळे संपवली आहे.मयत महिलेचा पती घरी आल्यावर झाला प्रकार लक्षात आला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत महिला जयश्री पाटील हि आपल्या डॉक्टर पती समवेत चासनळी येथे स्थायिक झाली होती.या दाम्पत्याला एक मुलगी असल्याचे समजते.पतीचा चासनळी येथेच दवाखाना असून तेथे ते वैद्यकीय सेवा पुरवितात.यांचे मूळ गाव जवळच असलेल्या गोदावरी नदी काठी मोर्विस येथील असून हे जोडपे अनेक वर्षांपासून चासनळी येथेच स्थायिक झाले होते.आज दि.१३ सप्टेंबर रोजी सकाळी नवरा घरासाठी दूध आणण्यासाठी गेला असता व लहान मुलगी हि बाहेर खेळण्यास गेली असता हि संधी साधून जयश्री पाटील या महिलेने घरातील पंख्याला दोरी बांधून आपली जीवनयात्रा अज्ञात कारणामुळे संपवली आहे.मयत महिलेचा पती घरी आल्यावर झाला प्रकार लक्षात आला आहे.त्यामुळे चासनळी सह तालुक्यात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान याबाबत मृत महिलेच्या नातेवाईकांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.मात्र कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीं दिलेल्या खबरीनुसार कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू दप्तर नोंदणी पुस्तिका क्रं.४०/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यची नोंद केली आहे.पुढील तपासपोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.ए. व्ही.गवसने हे करीत आहेत.