जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

ॲड.धोर्डे यांचे निधन!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


  कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष व कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रसिद्ध वकील ॲड.शंतनु सोपानराव धोर्डे (वय -६१) यांचे आज पुण्यात रात्री ८.३०वाजता उपचारानंतर निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक भाऊ राजेंद्र धोर्डे,पत्नी,एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.

स्व.शंतनु धोर्डे.

कोपरगाव येथे आपल्या विधी सेवेने त्यांनी अनेक दाव्यांना व अशिलांना न्याय मिळवून दिला होता अनेक राजकीय आणि महत्वाच्या दाव्यात त्यांनी त्यांची बाजू समर्थपणे मांडली होती.त्यांनी आपल्या वडिलानंतर विधी सेवेची सुरुवात केली होती.त्यानंतर त्यांनी सातत्याने त्यात यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत केली होती.

  कोपरगाव येथे आपल्या विधी सेवेने त्यांनी अनेक दाव्यांना व अशिलांना न्याय मिळवून दिला होता अनेक राजकीय आणि महत्वाच्या दाव्यात त्यांनी त्यांची बाजू समर्थपणे मांडली होती.त्यांनी आपल्या वडिल सोपानराव धोंडे यांचेनंतर सन -१९८८ साली विधी सेवेची सुरुवात केली होती.त्यानंतर त्यांनी सातत्याने त्यात यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत केली होती.त्यांचे मुळगाव वैजापूर तालुक्यातील डोणगाव हे होते.त्यांचे वडील वकिली व्यवसायाच्या निमित्त पहिल्यांदा कोपरगाव येथे आले होते.
त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.त्यासाठी पुण्यात त्यांनी बायपास शस्त्रक्रिया केली होती.मात्र शस्त्रक्रिया केल्यानंतर आज रात्री ८.३० वाजता पुन्हा एकदा त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला त्यात त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.स्व.ॲड.शंतनु धोर्डे यांच्या पश्चात संभाजीनगर येथील उच्च न्यायालय येथे कार्यरत असलेले चुलत बंधू ॲड.रमेश धोर्डे,पुणे येथे स्थापत्य अभियंता असलेले राजेंद्र धोर्डे,डॉ.विशाखा मातेले ही मुलगी तर ॲड.आनंदमय धोर्डे उच्च न्यायालय येथे कार्यरत असलेले वकिल आदी दोन मुले आहेत.त्यांच्यावर सकाळी ११ वाजता कोपरगाव नगरपरिषद अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   दरम्यान स्व.शंतनु धोर्डे यांच्या निधनाबद्दल शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,आ.आशुतोष काळे,संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे,वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंत जोशी,ॲड.मच्छिंद्र खिलारी,ॲड.अशोक टुपके,ॲड.दिलीप लासुरे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close