गुन्हे विषयक
घर बांधण्याच्या पैशासाठी महिलेचा छळ,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील माहेर व संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील सासर असलेल्या महिलेने आपल्या माहेराहून घर बांधण्यासाठी ०१ लाख २० हजार रुपये आणावे या साठी आपला आरोपी नवरा आकाश वसंत निळे,सासु कुसुम वसंत निळे,सासरा वसंत मुरलीधर निळे नणंद माधुरी सतीश भालेराव सर्व रा.घुलेवाडी यांनी आपला शारीरिक व मानसिक छळ केला असल्याबाबत फिर्यादी महिला सोनल आकाश निळे (वय-२२) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिला सोनल निळे हिचे लग्न संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील तरुण आकाश निळे याचे बरोबर दि.२६ जुलै २०२० रोजी मोठ्या डामडौलात संपन्न झाले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर या सासरच्या मंडळींनी आपले रंग अवघ्या पंधरा दिवसात दाखविण्यास प्रारंभ केला असून माहेराहून घर बांधण्यासाठी पैसे आणावे यासाठी छळ सुरु केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील माहेर असलेली फिर्यादी महिला सोनल निळे हिचे लग्न संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील तरुण आकाश निळे याचे बरोबर दि.२६ जुलै २०२० रोजी मोठ्या डामडौलात संपन्न झाले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर या सासरच्या मंडळींनी आपले रंग अवघ्या पंधरा दिवसात दाखविण्यास प्रारंभ केला व या नवविवाहित महिलेने आपल्या माहेराहून घर बांधण्यासाठी ०१ लाख २० हजार रुपये आणावे या साठी तिचा शारीरिक मानसिक छळ सुरु केला व तिला शिवीगाळ सुरु करून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास प्रारंभ केला.यात आरोपी नवरा आकाश वसंत निळे,सासु कुसुम वसंत निळे,सासरा वसंत मुरलीधर निळे नणंद माधुरी सतीश भालेराव सर्व रा.घुलेवाडी यांचा समावेश आहे.यात दि.०३ जुलै २०२१ रोजी शेवटची घटना असून त्या दिवशी फिर्यादीला सासरहून हाकलून दिले आहे.तिने या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३३५/२०२१ भा.द.वि.कलम ४९८(अ),३२३,५०४,५०६ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए.कुसारे हे करीत आहेत.