जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

आशाबाई कासार यांचे निधन

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेले कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी अनिल बबनराव कासार यांच्या मातोश्री ग.भा.आशाबाई बबनराव कासार (वय-७०वर्षे) यांचे आज बुधवार दिनाक 29 एप्रिल रोजी सायंकाळी ०६.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.त्यांचा अंत्यसंस्कार आज रात्री ०९,३० वाजता संवत्सर गोदातीरी येथे संपन्न होणार आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगी,एक मुलगा,नातवंडे असा परिवार आहे.

स्व.आशाबाई कासार.

     स्व.आशाबाई कासार या अत्यंत धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाच्या म्हणून संवत्सर आणि परिसरात परिचित होत्या.त्यांच्या निधनाबद्दल गोदावरी परजणे तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,सरपंच सुलोचना ढेपले,दिलीप ढेपले,उपसरपंच विवेक परजणे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांचे निधनाबद्दल
सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close