जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
परिवहन विभाग

बस आगाराला नवीन बस द्या-…या आमदारांची मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव बस आगारात बसेसची संख्या कमी असल्यामुळे व काही बस अतिशय जुन्या झाल्यामुळे त्याचा परीणाम बस सेवेवर होत असून प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे बस प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोपरगाव आगाराला नवीन बस मिळाव्यात अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेवून मागणीचे निवेदन दिले तो क्षण.

“यापूर्वीही नवीन बस मिळाव्यात यासाठी सातत्याने परिवहन खात्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव बस आगाराला दहा नवीन बस मिळाल्या आहेत.बस प्रवाशांना येणाऱ्या अडचणींची गांभीर्याने दखल घेवून पुन्हा नव्याने कोपरगाव बस आगाराला जास्तीत जास्त नवीन बस देणार असल्याचे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

   महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणावर बसच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.याचे मुख्य परिणाम ग्रामीण भागात दिसून येत असून,प्रवाशांना, विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.कोविड-१९ नंतरच्या काळात महामंडळाला साधारणपणे ५ हजार २०० पेक्षा जास्त बसेसचा तुटवडा जाणवत आहे.सुमारे १२ वर्षांहून अधिक काळ धावलेल्या २ हजारहून अधिक बसेस टप्प्याटप्प्याने भंगारात काढल्या जात आहेत,ज्यामुळे तुटवड्यात भर पडली आहे.परिणामी त्याचा गंभीर परिणाम ग्रामीण भागावर झाला आहे.बसेसच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातील वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून,अनेक ठिकाणी प्रवाशांना धोकादायक आणि बेकायदा वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे.शिर्डी हे तीर्थक्षेत्र कोपरगाव बस आगारात असल्याने हे राज्य परिवहन मंडळाला सर्वाधिक उत्पन्न देत असतानाही या आगाराला बस तुटवड्याचा सामना करावा लागत आहे हे विशेष !अनेक मार्गावर धावत असलेल्या बस अलीकडील काळात बंद झाल्या आहेत.शिवाय शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.त्यामुळे याची गंभीर दखल घेत कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी घेतली असून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन ही मागणी त्यांना सांगून कोपरगाव बस आगाराच्या बस वाढविण्याची मागणी केली आहे.

  त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेवून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”कोपरगाव बस आगारात कमी असलेल्या बसच्या संख्येमुळे बस प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.विद्यार्थी त्याला अपवाद नाही.शिर्डी-मनमाड-वैजापूर-श्रीरामपूर-संगमनेर- नाशिक या शहरांना जोडणारे कोपरगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे.याच बरोबर तीर्थक्षेत्र शिर्डी जवळ असल्यामुळे भाविकांना आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना,नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोपरगाव बस स्थानक अत्यंत महत्वाचे आहे.कोरोना संकट येण्यापूर्वी म्हणजेच २०१९ पूर्वी कोपरगाव बस आगारात एकूण ९० बसेस कार्यरत होत्या.मात्र सद्य स्थितीत ही संख्या कमी होवून ७२ वर आली आहे.यामध्ये एकूण ८ बस या १३ वर्षांपूर्वीच्या जुन्या असल्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी झालेली आहे.त्याचा परिणाम ग्रामीण भागातील तसेच शालेय फेऱ्यांवर होत असल्यामुळे बस सेवेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.कोपरगाव बस आगाराकडे बस संख्या कमी असल्यामुळे नियोजित फेऱ्या वेळेवर होत नाहीत.अनेक वेळा जुन्या झालेल्या कित्येक बस तांत्रिक बिघाड होवून रस्त्यातच बंद पडत असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो.विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.प्रवाशांच्या या अडचणींची दखल घेवून बस प्रवाशांचा व शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोपरगाव बस आगाराला तातडीने नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शेवटी आ.काळे यांनी केली आहे.त्या मागणीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close