जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

“जितके काम तितकेच बिल” या तत्वानुसार रस्त्यांची कामे सुरू करा-कोपरगावात नगराध्यक्षांचे आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील काही रस्त्यांची भयानक दुरावस्था झालेली आहे त्यामुळे नागरिक संतप्त असून या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे होणारे हाल व २८ विकास कामांना उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती हे विषय चर्चेचे होऊन सर्वत्र कोपरगाव शहराची बदनामीही होत आहे.त्यामुळे आपण याचिका कर्त्याना आवाहन करून संबंधित याचिका मागे घेण्याचे व जितके काम तितकेच बिल अशी सर्वसंमतीची भूमिका घेऊन विकासाचा मार्ग खुला करण्याचे आवाहन करत असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये नूकतेच केले आहे.त्यामुळे शहरातील नागरीकाचे या आवाहनांनंतर कोल्हे गट काय भूमिका घेतो याकडे लक्ष लागले आहे.

माजी आ.कोल्हे गटाने श्रेयवादाने पछाडून संबंधित कामांना खोडा घालण्यासाठी अद्याप काम सुरूच झाले नसतानाही भ्रष्टाचाराच्या नावाखाली उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून आगामी नगरपरिषद निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन स्थगिती आणली आहे.आता नगराध्यक्ष वाहाडणे यांनी समाजहितासाठी पुन्हा दोन पावले मागे घेतल्याने कोल्हे गट कोंडीत सापडला आहे.आता त्यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांच्या कामास माजी आ.कोल्हे गटाने श्रेयवादाने पछाडून संबंधित कामांना खोडा घालण्यासाठी अद्याप काम सुरूच झाले नसतानाही भ्रष्टाचाराच्या नावाखाली उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून आगामी नगरपरिषद निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन स्थगिती आणली आहे.त्यातच ‘आधी हौस आणि त्यात पडला पाऊस’ या म्हणूनुसार शहरातील रस्त्यांची पार रया गेली आहे.त्यामुळे शहरातील लोकप्रतिनिधी व त्यांचे नेते यांना शहरातील व बाहेरून येणारे नागरिक शिव्यांची लाखोली वहात असून माजी आ.कोल्हे गटाची व सत्ताधारी गटाची गोची झाली आहे.त्यातून मध्यम मार्ग काढण्यासाठी नुकतीच नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषद घेऊन व स्वतः पुढाकार घेऊन वाचा फोडली आहे.

त्यांनी या पत्रकार परिषदेद्वारे पुढे म्हटले आहे की,”सर्व राजकिय नेते-कार्यकर्ते यांनी नागरिकांचे हाल पाहून तरी वर्तमानात चालू असलेले आरोप प्रत्यारोप थांबवावे.यामुळे सर्वच राजकारणीही बदनाम होत आहेत.हे सर्व थांबविण्यासाठी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविणाऱ्या सर्व संबंधितांना व सर्वांनाच आपण विनंती करतो कि,आतापर्यंत झालेले आरोप प्रत्यारोप, मान-अपमान,राजकिय हेवेदावे विसरून उच्च न्यायालयातून आणलेली स्थगिती उठविण्यासाठी अर्ज देऊन स्थगिती उठवावी तरच नागरिकांचे हाल थांबणार आहेत.
    त्यानंतर आपण सर्व पक्षांचे गटनेते व दोन त्रयस्थ तज्ज्ञांची समिती नेमून सर्व कामे दर्जेदार करून घेऊ.अंदाजपत्रक कितीही रकमेचे असले तरी जेवढे काम होईल तितकेच मोजमाप करून ठेकेदारांची देयके अदा करू.राजकारणात आरोप प्रत्यारोप होतच असतात,तरी आपण कुणीही एकमेकांचे शत्रू नाही.निवडणूक येईल त्यावेळी प्रत्येकाला आपल्या पक्ष-गटाचे समर्थन करण्याचा अधिकार आहे.पण राजकिय हेवे दाव्यांचा
अतिरेक होऊन आपण सर्वजण
जनतेच्या मनातून कायमचे उतरायला नको इतके तरी भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.आज आपण कुणावरही दोषारोप करणार नाही.शहरात विकासकामे व्हावीत हेच महत्वाचे आहे,असे आपल्याला वाटते.
स्थगिती उठवून कामे झाली नाहीत तर  येणाऱ्या  नगरपरिषद निवडणुकीनंतरही असेच गढूळ वातावरण राहिले,एकमेकांना अडथळे आणले गेले तर ते कोपरगाव शहराच्या विकासाच्यादृष्टीने योग्य होणार नाही.श्रेय हा विषय आपल्याला तरी मान्य नाही.कारण मतदारांनी सर्वांना विकास कामे  करण्यासाठीच निवडून दिलेले असते. सर्वांच्याच सहकार्याने विकासकामे मार्गी लागत असतात.
त्यामुळे शहर विकासाचा मुद्दा विचारात घेऊन रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा असे आवाहनही अध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close