गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात जाळी तोडून 1.67 लाखांची धाडसी चोरी,गुन्हा दाखल
संपादक -नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस सुमारे सोळा कि.मी.अंतरावर असलेल्या शहाजापूर ग्रामपंचायत हद्दीत आज पहाटे सुमारे दोन ते तीन च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी स्वयंपाक खोलीच्या दरवाजाची जाळी तोडून घराची आतील कडी उघडून कपाटातील विविध सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख 67 हजार 256 रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तीन नोव्हेंबरच्या रात्री आज पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांच्या घराच्या स्वयंपाक गृहाच्या दरवाजाची जाळी तोडून आतील कडी उघडून घरात प्रवेश मिळवला व स्वयंपाक गृहातील कपाटाचा दरवाजा उघडून त्यातील 22 हजार 284 रुपये किमतीची दोन तोळे वजनाची एक सोन्याची मोहन माळ साखळी,82 हजार 200 रुपये किमतीची तीन तोळे वजनाची एक सोन्याची पट्टी पोत, 60 हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची मनिमंगळ सूत्रासह सोन्याची पोत,272 रुपये किमतीची एक अर्धा ग्रॅम वजनाची नथ,2 हजार 500 रुपये किमतीची रोकड त्यात पाचशे रुपये किमतीच्या नोटा,असा एकूण 1 लाख 67 हजार 256 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव शहराच्या पश्चिमेस शिर्डी-लासलगाव महामार्गावर शहाजापूर गाव असून या गावात गौतम पब्लिक स्कूल जवळ समर्थनगर येथे दूरदर्शन संच रिपेअर करणारे कारागीर संजय यादव आवारे (वय-40) हे आपल्या कुटुंबिया समवेत राहतात. ते तीन नोव्हेंबरच्या रात्री आज पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांच्या घराच्या स्वयंपाक गृहाच्या दरवाजाची जाळी तोडून आतील कडी उघडून घरात प्रवेश मिळवला व स्वयंपाक गृहातील कपाटाचा दरवाजा उघडून त्यातील 22 हजार 284 रुपये किमतीची दोन तोळे वजनाची एक सोन्याची मोहन माळ साखळी,82 हजार 200 रुपये किमतीची तीन तोळे वजनाची एक सोन्याची पट्टी पोत, 60 हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची मनिमंगळ सूत्रासह सोन्याची पोत,272 रुपये किमतीची एक अर्धा ग्रॅम वजनाची नथ,2 हजार 500 रुपये किमतीची रोकड त्यात पाचशे रुपये किमतीच्या नोटा,असा एकूण 1 लाख 67 हजार 256 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.दरम्यान हि घटना सकाळी उठल्यावर संजय आवारे यांच्या लक्षात आली. त्यांनतर त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी गु.र.नं.150/2019 भा.द.वि.कलम 457,380 प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळाला आज सकाळी दहा वाजता भेट देऊन श्वान पथकाला पाचारण केले होते. तथापि या चोरट्यांचा सुगावा लागला नाही.पुढील तपास अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.
दरम्यान या घटनेने शहाजापूर,कोळापेवाडी परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पंधरा दिवसांपूर्वी या ग्रामपंचायत हद्दीतच कालव्या नजीक दारोडेखोरांची एक टोळी पोलिसांनी जेरबंद केली होती.त्या नंतर हा प्रताप उघड झाल्याने याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का हे पोलिसांना तपासून पाहावे लागणार आहे.