गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात एकावर कत्तीने वार,गुन्हा नाही
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी ग्रामपंचायत हद्दीत काल रात्री आठ वाजेच्या सुमारास पब्जी खेळण्याच्या कारणावरून एका तरुणाने कत्तीच्या साहाय्याने केलेल्या हल्ल्यात एक दुसरा तरुण गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला स्थानिक कार्यकर्त्यांनी खाजगी दवाखान्यात भरती करून उपचार केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.मात्र या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मात्र गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती पोलिसी सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे मळेगाव थडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मळेगाव थडी येथे शुक्रवार दि.०९ एप्रिल रात्री आठ वाजेच्या सुमारास झाली असून काही वाळूचोर तरुण फावल्या वेळात पब्जी खेळत बसले असताना त्यांच्यात आपापसात वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.त्यात एक तरुणावर दुसऱ्या तरुणाने आपल्या हातातील कत्तीने थेट हल्ला चढवला असून त्यात त्याला जवळपास अठरा टाके पडल्याची माहिती माहितगार सुत्रानी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातील वाळूचा जाहीर लिलाव काही गावात झालेला आहे.त्यामुळे त्या ठिकाणी वाळूचोरांचा हैदोस सुरु झाला आहे.त्यातून गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.अशीच घटना मळेगाव थडी येथे शुक्रवार दि.०९ एप्रिल रात्री आठ वाजेच्या सुमारास झाली असून काही वाळूचोर तरुण फावल्या वेळात पब्जी खेळत बसले असताना त्यांच्यात आपापसात वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.त्यात एक तरुणावर दुसऱ्या तरुणाने आपल्या हातातील कत्तीने थेट हल्ला चढवला असून त्यात त्याला जवळपास अठरा टाके पडल्याची माहिती माहितगार सुत्रानी दिली आहे.त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान या प्रकरणी काही ग्रामपंचायतच्या दुय्यम पदाधिकाऱ्यांनी त्यात मध्यस्थी केली असून हा वाद स्थानिक पातळीवर मिटवला असल्याचे समजते.व जखमी तरुणाला स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे दाखल करून उपचार केला आहे.
या बाबत आमच्या प्रतिनिधीने या बाबत पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचेशी संपर्क साधला असता तो स्थापित होऊ शकला नाही.तथापि पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांना या बाबत माहिती विचारली असता त्यांना या घटनेची माहिती नसल्याचे उघड झाले आहे.आता या गंभीर गुन्ह्याबाबत पोलीस काय भूमिका घेतात या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.यातील हे तरुण निलामवाडी येथील असल्याची माहिती आहे.व जखमी तरुणांचे नाव गांगुर्डे तर हल्लेखोराचे नाव अशोक पवार असे असल्याची ग्रामस्थांत चर्चा आहे.