गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात दोन गटात हाणामारी,एकमेकावर गुन्हे दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील आरोपी अतुल विनायक लोंढे व अन्य सहा साथीदारांनी आपल्याला गैर कायद्याची मंडळी जमवून त्यांनी स्टंपने पाठीवर,पायावर,मारहाण करून तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून मी वकील आहे माझे वडील न्यायाधीश आहे अशी धमकी दिली असल्याचा गुन्हा फिर्यादी संजय सुभाष जाधव (वय-४४) रा.वारी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी संजय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आपण एकाच गावचे रहिवाशी असून आरोपी अतुल लोंढे संगीत विनायक लोंढे,बाभूळगाव खुर्द ता.येवला गोरख शंकर टेके,सूरज गोरख टेके,राजेंद्र शंकर टेके,अभिजित गोरख टेके,संजय वाबळे,(पूर्ण नाव माहित नाही)आदींनी आपल्याला दि.२८ मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आपण व साक्षिदार यांना गैर कायद्याची मंडळी जमवून स्टंपने पाठीवर,पायावर,मारहाण केली व लाथाबुक्यांनी मारहाण करून ,”मी वकील आहे,माझे वडील न्यायाधीश आहेत अशी धमकी दिली आहे.अशा कारणावरून गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र,क्रं.१००/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,१४१,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६,प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.
दरम्यान या आधी अतुल विनायक लोंढे रा.बाभूळगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यात त्यांनी आरोपी संजय सुभाष जाधव,अभिजीत दीपक जाधव,माजहरी सुभाष जाधव,भूषण दीपक जाधव,नामदेव शिंदे,संदीप सुरेश जाधव,विठ्ठल बाळासाहेब जाधव,जय संजय जाधव सर्व राहणार वारी तालुका यांनी फिर्यादी व साक्षीदारांना आरोपित यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून सोमैय्या कारखाना मैदान येथे दुपारी दोन वाजता बॅट स्टॅम्पनी हातावर करंगळीवर मारहाण करून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली मजकूराची फिर्याद वरून गुन्हा दाखल आहे.त्यामुळे या गुन्ह्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.