निधन वार्ता
साबळे महाराज यांचे देहावसान

जनशक्ती न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनीधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी व ग्रामपंचायत कर्मचारी भरत दशरथ साबळे यांचे पिताश्री ह.भ.प.दशरथ महाराज साबळे (वय-९६)यांचे नुकतेच वृद्धपकाळामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,एक मुलगा,दोन मुली,नातवंडे आदी परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ह.भ. प.साबळे महाराज हे महंत नारायणगिरीजी महाराज यांचे शिष्य होते.त्यांनी आपल्या हयातीत त्यांच्या बरोबर तब्बल ८५ हरींनाम सप्ताह संपन्न केले होते.ते शिवरात्रीच्या कीर्तन महोत्सवात ह.भ.प.शिवाजी महाराज भालुरकर यांच्या कीर्तनात आपली सेवा बजावत असत.
स्व.साबळे महाराज हे अत्यन्त धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे म्हुणून संवत्सर व परिसरात परिचित होते.ते महंत नारायणगिरीजी महाराज यांचे शिष्य होते.त्यांनी आपल्या हयातीत त्यांच्या बरोबर तब्बल ८५ हरींनाम सप्ताह संपन्न केले होते.ते शिवरात्रीच्या कीर्तन महोत्सवात ह.भ.प.शिवाजी महाराज भालुरकर यांच्या कीर्तनात आपली सेवा बजावत असत.या खेरीज लक्ष्मणवाडी येथील सप्ताहात काल्याचे कीर्तनात व सामाजिक,व धार्मिक कार्यात पुढाकार घेत असत.त्यांच्यावर संवत्सर येथे गोदावरीतीरी शोकाकुल वातावरणात कोरोनाचे भान राखून अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यांच्या निधनाबद्दल माजी मंत्री राधाकृष्ण विखे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,गोदावरी परजणे दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.