जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात पोलिसांची अवैध कत्तलखान्यावर धाड,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगांव-(प्रतिनिधी)

संवत्सर मनाई वस्ती येथे स्वतंत्र कत्तलखाना उपलब्ध करूनही कोपरगाव शहरातील नगरपरिषदेपासून हाकेच्या अंतरावरील संजयनगर उपनगरात अद्यापही अवैध कत्तलखाना सुरूच असल्याबद्दल कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी संताप व्यक्त केला असताना कोपरगाव शहर पोलिसानी आज ऍक्शन मोड मध्ये येऊन संजयनगर आयेशा कॉलनी येथे सुरु असलेल्या अवैध गोवंश करणाऱ्याविरुद्ध कारवाई केली असून त्यातील आरोपी अन्सार गफार कुरेशी (वय-३०) व अतिक मुज्जू कुरेशी (वय-१९) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

“संबंधित कसायांनी गोवंश हत्त्या बंद करून मनाई येथील कत्तलखान्याचा वापर करावा या आवाहनाची दखल घेऊन कोपरगाव शहर पोलिसानी केलेली कारवाई केली ती स्तुत्य असून पोलिसांनी या पुढील काळातही अशीच कारवाई करून पालिकेला सहकार्य करावे“-विजय वहाडणे, नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव शहरातील संजयनगर येथील बेकायदा कत्तलखाना शहराच्या आरोग्यासाठी हानिकारक होता.म्हणून औद्योगिक वसाहती जवळील संवत्सर ग्रामपंचायत हद्दइत”मनाई” येथे सोयीसुविधा युक्त कत्तलखाना “स्लॉटरहाऊस” कोपरगाव नगरपरिषदेने सुरू करून म्हैसवर्गीय जनावरे कत्तल करण्याची सोय करून दिलेली आहे.असे असतांनाही संजयनगर येथे बेकायदेशीरपणे गोवंश हत्त्या होत होती.याबाबत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार या घटकांना सांगूनही असे प्रकार सर्रास सुरू होते.याच कसाई वर्गाला विक्रीसाठी कोपरगाव नगरपरिषदने जागाही उपलब्ध करून दिली आहे. मात्र अनेकांनी त्याचे भाडेही थकवलेले आहे.रात्री अपरात्री गोवंश कत्तल करून नगरपरिषदेच्या व शासनाच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम सुरू आहे.संबंधितांना अनेकदा सांगूनही मनाई येथील अधिकृत कत्तलखान्याचा वापर होत नाही,दुकानांचे भाडेही थकविलेले आहे.गोवंश हत्त्या करून शहरवासीयांच्या भावनांशी खेळण्याचे काम सुरू आहे.रात्री अपरात्री बेकायदा कत्तल करून रक्त-मांस नाल्यात व नाल्यातून नदीत सोडल्याने सर्वांचेच आरोग्य धोक्यात आले आहे” असा गंभीर आरोप नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकताच एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस देऊन केला होता.त्याची गंभीर दाखल कोपरगाव शहर पोलिसांनी घेतलेली दिसत असून आज दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या पथकाने संजयनगर आयेशा कॉलनी येथे धाड टाकून धाडसी कारवाई केली आहे.त्यावेळी पोलिसांना तेथे वरील दोन आरोपी संजयनगर भागात उघड्यावर गोवंश कत्तल करताना आढळून आले आहे.त्यावेळी त्यांनी घटनास्थळी १० हजार ७०० रुपये किमतीचे गोमांस पांढऱ्या रंगाच्या गोणीत व उघडल्यावर पडलेले दिसून आले आहे.या खेरीज घटनास्थळी २०० रुपये किमतीचे दोन धारदार लोखंडी कोयते,१०० रुपये किमतीचा एक तराजू,५०० रुपये किमतीचे वजन मापे आदी ऐवज आढळून आला आहे.त्या बाबत पोलिसानी आरोपी विरुद्ध कारवाई करत अटक केली आहे.

कोपरगाव शहर पोलिस कॉ. सचिन रामनाथ शेवाळे (वय-३०) या प्रकरणी आरोपी अन्सार कुरेशी व अतिक कुरेशी यांच्या विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१०१ /२०२१ मुंबई पोलीस कायदा कलम १०५,महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा आधी नियम कलम १९९५ चे कलम ५,९,भा.द.वि.कलम ४२९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी. आर.तिकोणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close