जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

सेनेच्या माजी शहर प्रमुखास खंडणीसाठी कोयत्याने मारण्याची धमकी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर शिवसेनेचे माजी प्रमुख भरत आसाराम मोरे यांना आरोपी सचिन संजय साळवे रा.गजानननगर याने मेडिकल चालविणेबाबत हप्त्याच्या खंडणीपोटी दरमहा दहा हजार रुपये मिळण्यासाठी बळजबरीने फिर्यादीचे मेडिकलमध्ये प्रवेश करून हातातील लोखंडी कोयत्याच्या सहाय्याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्यादी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहराचे बस स्थानकासमोर प्रगती मेडिकल नावाचे गोळ्या औषधें विकण्याचे दुकान आहे.त्यांना मेडिकल चालविण्याच्या खंडणीच्या हप्त्यापोटी दरमहा दहा हजार रुपये मिळणे करता बळजबरीने मेडिकल मध्ये प्रवेश करून आरोपी सचिन गजाजन साळवे याने दि.७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून येऊन फिर्यादीचे मेडिकल मध्ये आपल्या हातात लोखंडी कोयता घेऊन शिवीगाळ करून भरत मोरे यांना जीवे मारण्याची नुकतीच धमकी दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी भरत मोरे हे शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष असून वर्तमानात कोपरगाव बस आगाराचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत.त्यांचे कोपरगाव शहराचे बस स्थानकासमोर प्रगती मेडिकल नावाचे गोळ्या औषधें विकण्याचे दुकान आहे.त्यांना मेडिकल चालविण्याच्या खंडणीच्या हप्त्यापोटी दरमहा दहा हजार रुपये मिळणे करता बळजबरीने मेडिकल मध्ये प्रवेश करून आरोपी सचिन गजाजन साळवे याने दि.७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून (क्रमांक एम.एच.१७ सी.ए.४८६५) येऊन फिर्यादीचे मेडिकल मध्ये प्रवेश करून आपल्या हातात लोखंडी कोयता घेऊन शिवीगाळ करून भरत मोरे यांना जीवे मारण्याची नुकतीच धमकी दिली आहे.या प्रकरणी भरत मोरे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दि.१० फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४७/२०२१ भा.द.वि.कायदा कलम ३८७,४५२,५०४,५०६ व भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे आरोपी सचिन साळवे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी. आर.तिकोणे हा करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close