जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

बहादरपुरात फारूक बेग यांचा सत्कार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील बहादरपुरात कै.भाऊसाहेब शिवराम रहाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवार दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत प्रांगणात स्नेहप्रेम संस्थेच्या माध्यमातून अनाथांचे पुनर्वसन करणारे सामाजिक कार्यकर्ते फारूक शेख व श्रद्धा व स्नेहस्रद्धा या संस्थांच्या माध्यमातून गत पाच वर्षांपासून मनोरुग्णासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्या कु.सुलक्षणा आहेर यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती मुंबईस्थित शिवसेनेचे नेते शिवाजी रहाणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेंद्रिय बियाणे बँक बनविणाऱ्या व केंद्र सरकारने गौरविलेल्या अकोल्याच्या पद्मश्री राहिबाई पापेरे व स्नेहालयचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गिरीश कुलकर्णी,व कोपरगाव तालुका एज्युकेशन संस्थेचे संचालक संदीप रोहमारे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमास बहादरपूर व परिसरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमती रुक्मिणी रहाणे व ग्रामस्थांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close