शैक्षणिक
टर्न कोट डिबेट स्पर्धेत समृध्दी आणि साईदिपचे यश
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सहोदया संगम सी.बी.एस.ई.स्कूलच्या टर्न कोट डिबेट आॅनलाईन स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या असून या स्पर्धेत ११ शाळेच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूल येथील नववीचे विद्यार्थी समृध्दी राजेंद्र कोहोकडे हिने व्दितीय तर साईदिप मृत्युंजय मंडल याने उत्तेजनार्थ क्रंमाक मिळाला आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सदर स्पर्धेमध्ये भारतातील कोरोना टाळेबंदी या विषयावर सकारात्मक आणि नकारात्मक मत विद्यार्थ्यानी मांडायचे होते.तर समृध्दी कोहोकडे आणि साईदिप मंडल यानी कोरोना टाळेबंदी बद्दलचे आपले विचार मांडले,यामुळेच अकरा शाळांमधुन विद्यालयातील दोनही विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य यानी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण सर्व विश्वस्त,प्राचार्य,पर्यवेक्षिका सौ. जे.के.दरेकर व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख स्वप्निल पाटील व सारिका सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले होते.