जाहिरात-9423439946
खेळजगत

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत आर्यन घोडके यास सुवर्ण पदकाची कमाई

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

माध्यप्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळ या ठिकाणी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत १९ वर्षें वयोगटात कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयातील विद्यार्थी घोडके आर्यन दिलीप याने लक्षवेधी खेळाचे प्रदर्शन करून महाराष्ट्र संघास तलवारबाजी मधील ( फॉईल टीम ) या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाची कामे केली आहे त्याच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

भोपाळ येथे नुकत्याच राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा संपन्न झाल्या आहेत त्यात त्याने हे यश संपादन केले आहे. महाराष्ट्र संघाबरोबर आपल्या महाविद्यालयाचे देखील नाव उंचावले त्याच्या या उत्कृष्ट कामगिरी बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. एस. आर. थोपटे, उपप्राचार्य. डी. डी. सोनवणे, महाविद्यालयाचे, अधिक्षक व्ही. एस. पवार, मुख्य लिपिक एस. के. पवार, महाविद्यालय विकास समिती सदस्य, तसेच महाविद्यालयाचे शिक्षक वृन्द, माजी खेळाडु व विद्यार्थी यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विशाल पवार, प्रा. शिवप्रसाद जंगम, प्रा. आकाश लकारे, यांचे घोडके यास मार्गदर्शन लाभले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close