न्यायिक वृत्त
महामार्गावर 44.28 लाखांचा गुटखा जप्त,आरोपीस सहा दिवसांची पोलिस कोठडी !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गावर अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत नुकताच 44.28 लाख रुपयाचा अवैध गुटखा पकडला असून यातील आयशर चालक दिनेश रामचंद्र शर्मा (वय-47) यास पोलिसांनी जेरबंद केले असून आज दुपारी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वाय.जे.तांबोळी यांचे न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीस 30 ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच 06 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान आज अटक आरोपी चालक दिनेश रामचंद्र शर्मा याला कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वाय.जे.तांबोळी यांचे न्यायालयात हजर केले असता आरोपीच्या वतीने ॲड.केतन शिरोडे यांनी युक्तिवाद केला होता तर सरकारी पक्षाच्या वतीने ॲड.उत्तम पाईक यांनी बाजू मांडली होती.दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी दिनेश शर्मा याला 30 ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच 06 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कोपरगाव तालुक्यात आणि विशेषतः समृद्धी महामार्गाच्या परिसरात अवैध गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा वाढता सुळसुळाट खरोखरच अत्यंत चिंताजनक विषय बनला आहे.या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा आणि कोपरगाव पोलिसांनी अलिकडेच अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत.गुप्त माहितीच्या आधारे नुकतीच भोजडे शिवारात समृद्धी महामार्गावर कि.मी.509 जवळ तब्बल ४४ लाख २८ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहून नेणारा आयशर टेम्पो पकडण्यात आला असून,वाहनासह एकूण ६९ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.समृद्धी महामार्गावरील 509 क्रमांकाच्या ठिकाणी आयशर टेम्पो अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळ काढला होता.तो जवळपास बारा किलोमीटर पुढे जाऊन महामार्गावरून खाली उतरला होता.मात्र नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले होते.
दरम्यान या प्रकरणात कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 484/2026 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 चे कलम व त्याखालील नियम व नियमणे 2011 चे कलम 26 (2) (१), 26(२)(०४), 27(3)(डी), 27(3)(इ), 30(2)(ए), 3(१)(झेड,झेड)(०४), 59,भारतिय न्याय संहिता कलम 123,223, 274, 275, 3(5) प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
यात अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव दिनेश रामचंद्र शर्मा असून,तो मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या प्रकरणातील इतर सात आरोपी फरार असल्याची माहिती आहे.त्यामध्ये रवींद्र कुमार उर्फ जालीम सिंग (रा. इंदूर),दिलीप बदलानी (रा.जळगाव), सतीश जयस्वाल उर्फ लाला आणि सोहेल उर्फ नदीम (दोघे रा.संभाजीनगर),अक्षय भंडारी आणि धर्म सुपेकर (दोघे रा.जालना),तसेच लाला जयस्वाल (रा.संभाजीनगर) आदींचा समावेश आहे.
दरम्यान आज अटक आरोपी चालक दिनेश रामचंद्र शर्मा याला कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वाय.जे.तांबोळी यांचे न्यायालयात हजर केले असता आरोपीच्या वतीने ॲड.केतन शिरोडे यांनी युक्तिवाद केला होता तर सरकारी पक्षाच्या वतीने ॲड.उत्तम पाईक यांनी बाजू मांडली होती.दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी दिनेश शर्मा याला 30 ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच 06 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती हाती आली आहे.गुटख्याचा पुरवठा करणार्या साखळीचा उलगडा करण्यासाठी आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे,पोलीस उपाधीक्षक अमोल भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.पुढील तपास कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करत आहेत.



