जाहिरात-9423439946
संपादकीय

…हे दुर्भाग्य कोपरगावकरांच्या नशिबी न येवो !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

    कोपरगाव शहराला नियमित पाणी मिळण्याचे पाहिलेले स्वप्न लवकरच सत्यात उतरणार असल्याचे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी देऊन आगामी नगरपरिषद,विधानसभा निवडणूक जवळ आल्याचे सूतोवाच केले आहे.त्यामुळे शहर आणि तालुक्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

   

दरम्यान राष्ट्रवादीत (अजित पवार गट) पदाधिकारी  निवडीवरून वरिष्ठ नेत्यांसमोर वादंग माजले असून सरळ दोन तट पडले आहे.रेशन,वाळू घोटाळ्यात अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे जवळचे कर्मचारी गुंतले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.त्यावर विद्यमान लोकप्रतिनिधीने नाराजी व्यक्त केली असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे अजित राष्ट्रवादीचा फुगा आगामी काळात फुटला तर ते वावगे मानू नये.

कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न गत विधानसभा निवडणुकीपूर्वी तब्बल पाच वर्ष गाजला होता यात भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते विजय वहाडणे व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे,निळवंडे कालवा कृती समिती आदींनी महत्वाचीं भूमिका निभावली होती.त्यामुळे आ.आशुतोष काळे यांना मोठा विजय मिळाला होता.तर,”तब्बल ६० हजारांचे मताधिक्क्य मिळून आपला विजय होणार” असा फाजील आत्मविश्वास असलेल्या माजी आ.कोल्हे यांचा सपाटून पराभव झाला होता.त्यामुळे निवडणूक संपन्न झाल्या झाल्या आ.काळे व तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे आदींनी या प्रकरणाची मोठी धास्ती घेऊन शासनदरबारी पाठपुरावा केल्यामुळे ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी मिळवला होता.मात्र यांच्या तोंडून एकदाही या कार्यकर्त्यांचे कौतुक झाल्याचे दिसले नाही.(कोत्या मनाच्या माणसाकडून कोणती अपेक्षा करणार म्हणा !) हे या लढाईतील मंडळी जाणून आहेच.मात्र पाच वर्षाचा कालखंड उलटूनही अद्याप हा तलाव काही पूर्ण झालेला नाही त्यामुळे शहर वासीयांत मोठी चिंता आहे.कारण या बाबत अपेक्षित वेग मिळालेला नाही.या पूर्वी माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी २०११ साली नगराध्यक्षपदी संजय सातभाई असताना केंद्रातून तब्बल ४२ कोटी  रुपये आणूनही ते कोणत्या बिळात गेले हे कोणालाही समजले सुद्धा नाही.उलट त्यातील मलिदा कोणी कोणी खाल्ला याच्या सविस्तर कहाण्या वृत्त पत्रात आणि सामाजिक वृत्त संकेतस्थळावर चवीने चघळल्या गेल्या होत्या.त्यामुळे चिंताग्रस्त नागरिकांनी याचे निळवंडे तर होणार नाही ना ? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु केली आहे.कारण प्रत्येक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी व त्याचे उदघाटन करण्यासाठी निवडणूक जवळ येण्याची वाट आवर्जून पाहिली जाते.हि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची जुनी ‘खोड’ (की ‘खासियत’ हे ज्याने त्याने ठरवलेले बरे ) आहे.आताही लोकसभा,विधानसभा,नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती आदींच्या निवडणुका आल्या आहेत त्यामुळे या लढाईला आवर्जून जोर चढणार हे ओघाने आले आहे.आता पर्यंत निळवंडे,गोदावरी खोऱ्यातील अकरा टी.एम.सी.शेती सिंचनाचे पाणी,उजनी चारी,पश्चिम घाट माथ्यावरील पाणी,एम.आय.डी.सी.रस्ते,तालुक्यातील अवैध वाळू हे प्रश्न आवर्जून गाजवले जातात.पूर्वी गणेश कारखान्याची पिपाणी माजी मंत्री कोल्हे यांनी जवळपास दोन दशक वाजवली होती.तो कारखाना जेंव्हा तत्कालीन खा.विखेंकडे गेला त्यावेळी ती बंद करण्यात आली होती.आता तो कारखाना कोल्हे-थोरात गटाकडे आल्याने आता ती विखेची मक्तेदारी बनली जाणार हे ओघाने आलेच.व तो अच्छाखांसा अंदाज आल्याने त्यांनी आता आपल्या मतदारांना फुकटचे देवदर्शन सुरु केले असून खास (न मागता) साखर पेरा सुरु केला आहे.या उत्तर नगर जिह्यातील परिघातील नेत्यांनी या पूर्वी ५३ वर्षे जनतेला असेच झुंजवले होते.यांच्या…या नादी लावण्याच्या कला देशभर प्रसिद्ध असल्याची अनुभूती आहे.आता कालवा कृती समितीने कालव्यांना न्यायिक व रस्त्यावरील लढाईतून हे पाणी आणले असता यांनी स्रेयवादास मुळीच उशीर केला नाही.(दुष्काळी शेतकरी खनपुटाच्या काठ्या घेऊन मागे लागे पर्यंत)आपणच या प्रकल्पाचे जलदुत,जलनायक असल्याचे निर्लज्जपणे सांगुल आपले हसे करून घेतले आहे हे वेगळे सांगळे न लगे ! हे दुर्भाग्य कोपरगावकरांच्या नशिबी न येवो इतकेच या निमित्ताने.

   ताजा कलम दरम्यान राष्ट्रवादीत (अजित पवार गट) पदाधिकारी  निवडीवरून वरिष्ठ नेत्यांसमोर वादंग माजले असून सरळ दोन तट पडले आहे.रेशन,वाळू घोटाळ्यात अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे जवळचे कर्मचारी गुंतले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.त्यावर विद्यमान लोकप्रतिनिधीने नाराजी व्यक्त केली असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे अजित राष्ट्रवादीचा फुगा आगामी काळात फुटला तर ते वावगे मानू नये.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close