जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

वाळू हल्ला प्रकरण,आरोपींना १२ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी शिवारात अवैध वाळू उपसा करून वन विभागात अवैधसाठा केल्या प्रकरणी वन विभागाचे नगर येथील पथकाने कारवाई करताना वाळूचोऱ्यानी त्यांचेवर हल्ला  केल्याप्रकरणी त्यांना कोपरगाव तालुका पोलिसांनी काल मध्यरात्री रात्री अटक करून आज कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्या.जे.एस.केळकर यांचे न्यायालयात हजर करून त्याची सुनावणी होऊन आरोपी दिपक चंद्रभान मोरे,(वय-३२ वर्षे) आकाश नंदकिशोर निंबाळकर,(वय-२९ वर्षे) देवराम वाल्मीक कोळपे (वय-३९ वर्षे) सर्व रा.कोळगाव थडी आदीसह ०८ आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

कोळगाव थडी येथील अवैध वाळूसाठा प्रकरणातील १२ आरोपींचा कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी शोध घेत होते.त्यांनी काल मध्यरात्री यातील आरोपी दिपक चंद्रभान मोरे,(वय-३२ वर्षे)आकाश नंदकिशोर निंबाळकर,(वय-२९ वर्षे,)देवराम वाल्मीक कोळपे (वय-३९ वर्षे) सर्व रा.कोळगाव थडी,प्रतीक मोहन कोळपे,(वय-२४ वर्षे),जालींदर भागवत पांढरे,(वय-३८ वर्षे)राहुल रविंद्र निकाळे,(वय २८ वर्षे),सर्व रा.कोळपेवाडी,वसिम मोहम्मद शेख,(वय-३० वर्षे) कृष्णा जनार्दन काळे,(वय-३५ वर्षे) दोघे रा.कोळगाव थडी,आदी ०८ आरोपींना १० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री जेरबंद करण्यात आले होते.त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

  याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”दि.०८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ११.३० वाजता कारवाई करण्यासाठी अहिल्यानगर वन विभागाला काही नागरिकांनी ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या.त्यातून वन विभागाने आपले अधिकारी आणि कर्मचारी आदींना कारवाईसाठी पाठवले होते.ते नगर येथून दोन वाहने घेऊन घटनास्थळी म्हणजेच कोळगाव थडी या ठिकाणी काही साक्षीदारांसह आले होते.त्यांनी गोदावरी नदी पात्रातुन राखीव वनक्षेत्रात अवैध रित्या प्रवेश करुन वाळुची साठवणूक करून चोरटी वाहतुक करणा-या स्वराज कंपनीच्या मालकीच्या ट्रॅक्टरला काल मध्यरात्री ११.३० ते ०१ वाजेच्या सुमारास पकडले होते.वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कारवाई करण्याचा राग मनात धरून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी आरोपी दिपक चंद्रभान मोरे,आकाश नंदकिशोर निंबाळकर,नंदकिशोर लक्ष्मण निंबाळकर,देवराम वाल्मीक कोळपे,निलेश नंदकिशोर निंबाळकर,वसिम मोहम्मद शेख,कृष्णा जनार्दन काळे,कृष्णा जनार्दन काळे सर्व रा.कोळगाव थडी,प्रतीक मोहन कोळपे,जालीदर पांढरे,राहुल रविंद्र निकाळे,संदीप साहेबराव निकाळे,किरण साहेबराव निकाळे,रा.कोळपेवाडी,अर्जुन गुरळे रा.मुर्शतपुर,आनंद उर्फ बंटी साळवे रा.सुरेगाव व इतर ३५ ते ४० अनोळखी इसमांनी हातात लोखंडी रॉड,लाकडी काठ्या,लोखंडी कोयते घेऊन फिर्यादी व साक्षीदार यांचा रस्ता अडवुन फिर्यादी व साक्षीदार बसलेल्या शासकीय वाहनावर हल्ला करून त्याची तोडफोड केली असून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

   या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दरम्यान याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.-450/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 132,121,126(2)189(2),190,191,324(4),351(2),352,303 (2) सार्वजनिक मालमता नुकसान प्रतिबंधक भारतीय वन अधिनियम 26(डी)(जी),(एच/कलम 41,42(2),52,महाराष्ट्र गौण खनिज प्रतिबंधक कायदा कायदा 1957 चे कलम 21 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी या आरोपींचा शोध घेत होते.त्यांनी काल मध्यरात्री यातील आरोपी दिपक चंद्रभान मोरे,(वय-३२ वर्षे)आकाश नंदकिशोर निंबाळकर,(वय-२९ वर्षे,)देवराम वाल्मीक कोळपे (वय-३९ वर्षे) सर्व रा.कोळगाव थडी,प्रतीक मोहन कोळपे,(वय-२४ वर्षे),जालींदर भागवत पांढरे,(वय-३८ वर्षे)राहुल रविंद्र निकाळे,(वय २८ वर्षे),सर्व रा.कोळपेवाडी,वसिम मोहम्मद शेख,(वय-३० वर्षे) कृष्णा जनार्दन काळे,(वय-३५ वर्षे) दोघे रा.कोळगाव थडी,आदी ०८ आरोपींना १० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री जेरबंद करण्यात आले होते.

  दरम्यान त्यांना आज कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.एस. केळकर मॅडम यांचे न्यायालयात त्यांना हजर केले होते.त्याबाबत न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींना दोन दिवसांची म्हणजेच १२ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक अभियोक्ता ॲड.उत्तम पाईक यांनी काम पाहिले तर आरोपींच्या वतीने ॲड.नितीन गंगावणे यांनी काम पाहिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

  दरम्यान अद्याप मुख्य आरोपींपैकी आठ आरोपी पकडले असून अद्याप त्यातील प्रमुख ०४ प्रमुख आरोपी अटक करण्याचे बाकी असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरर्डें हे करीत आहेत.पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.




जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close