जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पतंगासाठी नायलॉन मांजाचा वापर,तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात जीवसृष्टीसाठी हानिकारक ठरणारा व अनेकांना जखमी करणारा व पतंगासाठी बंदी असलेला नायलॉन मांजा वापरल्याच्या कारणावरून कोपरगाव शहर पोलिसानी आरोपी अलीम कलीम शेख (वय-२५) रा.दत्तनगर व अन्य आरोपी शेरू मुक्तार शेख (वय-१९) रा.गांधीनगर,शहजादी दाऊद पठाण रा.टाकळी या तिघांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने पतंग उडवणाऱ्या बेताल तरुणांत खळबळ उडाली आहे.

पतंग हा मकर संक्रातिला पण काही जण उडवतात तर काही अति उत्साही तरुण आधीपासूनच आपला उत्सव सुरु करतात.त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे प्लाास्टिक मांजा वापरू अन्य यासाठी आधीच पोलीस खबरदारी घेत आहे.हि बाब कौतुकाची आहे.

संक्रात सण जसा-जसा जवळ येऊ लागतो तसे तरुणांना पतंगाचे वेध लागतात.संक्रांतीला अद्याप दहा दिवसांचा अवकाश आहे.मात्र काही अतिउत्साही तरुण आत्ताच पतंगबाजी करून अनेकांना अडचणी निर्माण करत असल्याचे सार्वत्रिक चित्र दिसू लागले आहे.कोपरगाव शहरात अनेकांना पतंगामुळे आपला जीव गमवावा लागल्याची पुष्कळ उदाहरणे घडली आहे.विशेषतः पतंगासाठी वापरण्यात येणारा प्लास्टिकचा चिनी मांजा हा अनेकांसाठी जीवघेणा ठरत आहे.संक्रात जशी-जशी जवळ येत चालते तशी-तशी पातळ ताव व बांबूच्या कामट्या वापरुन पतंग बनविणाऱ्या कारागिरांची घाई उडताना दिसून येते.त्यावर शासनाने प्रतिबंध केला आहे.वर्तमानात तशीच गडबड सुरु आहे.तयार होणाऱ्या पतंगाला दोऱ्याच्या सहाय्याने आकाशात उडविले जाते.पतंग उडविताना मांजाची चक्री धरण्यास एक व पतंगाला ढील देण्यास एक,अशा दोन व्यक्ती लागतात.पतंगाची दोरी म्हणजेच ‘मांजा’काचेचा (वस्त्रगाळ) भुगा आणि शिजवलेल्या भातात घोळवला जातो.यामुळे तो कडक बनतो व इतर पतंग काटू शकतो.बारीक असलेला बरेली मांजा उत्कृष्ट मानला जातो.आणि पतंग हा मकर संक्रातिला पण काही जण उडवतात तर काही अति उत्साही तरुण आधीपासूनच आपला उत्सव सुरु करतात.त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे प्लाास्टिक मांजा वापरू अन्य यासाठी आधीच पोलीस खबरदारी घेत आहे.हि बाब कौतुकाची आहे.

या खबरदारीतून दोन गुन्हे कोपरगाव शहर पोलिसांनी नोंदवले आहे.त्यात अलीम शेख दत्तनगर व दुसरा शेरू मुक्तार शेख (वय-१९) रा.गांधीनगर,अलीम कलीम शेख (वय-२५) रा.दत्तनगर व अन्य आरोपी शेरू मुक्तार शेख (वय-१९) रा.गांधीनगर,शहजादी दाऊद पठाण रा.टाकळी यांचे विरुद्ध भा.द.वि.कलम १८८,३३६,सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ५ प्रमाणे तीन गुन्हे दाखल केल्याने बेताल पतंगबाजी कणाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.कोपरगाव शहर पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार व पोलीस नाईक बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close