गुन्हे विषयक
बांध सरळ करण्याच्या कारणावरून दोन गटात मारहाण

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत पानमळा येथील रहिवाशी असलेले ताजुद्दीन फकीर सय्यद (वय-४५) हे आपल्या घासास पाणी भरत असताना आरोपी युसूफ हुसेन सय्यद,युनूस हुसेन सय्यद,हे बांधावरील झाडे तोडीत असताना त्यानां फिर्यादी यांनी आधी बांध सरळ करून मगच झाडे तोडण्याची विनंती केल्याचा राग येऊन आरोपींना त्याचा राग आला व त्यांनी फिर्यादी व साक्षिदार यांना वाईट-वाईट शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून हातातील पावड्याने डोक्यावर,हातावर,पाठीवर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे चांदेकसारे परिसरात खळबळ उडाली आहे.
वर्तमानात रब्बीचा हंगाम सुरु असून पिके उभारणीचा व माशागतींचा कालखंड सुरु आहे.दरम्यान अनेक शेतकऱ्यांची कामे वेगाने सुरु आहे.त्यामुळे शेतात येणाऱ्या शेतकऱ्यांत विविध कारणावरून कुरबुरी होत असल्याच्या घटनात या कालखंडात लक्षणीय वाढ होताना दिसते आहे.अशीच घटना चांदेकसारे हद्दीत नुकतीच रविवार दि.०३ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
वर्तमानात रब्बीचा हंगाम सुरु असून पिके उभारणीचा व माशागतींचा कालखंड सुरु आहे.दरम्यान अनेक शेतकऱ्यांची कामे वेगाने सुरु आहे.त्यामुळे शेतात येणाऱ्या शेतकऱ्यांत विविध कारणावरून कुरबुरी होत असल्याच्या घटनात या कालखंडात लक्षणीय वाढ होताना दिसते आहे.अशीच घटना चांदेकसारे हद्दीत नुकतीच रविवार दि.०३ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली असून फिर्यादी ताजुद्दीन सय्यद हे आपल्या शेतात जनावरांना घास कापत असताना त्याच वेळी आरोपी युसुफ सय्यद व युनूस सय्यद हे आले व त्यांनी सामायिक बांधावरील काही झाडे तोडण्यास सुरुवात केली असता त्याला फिर्यादी ताजुद्दीन सय्यद यांनी त्यास हरकत घेतली व आधी सामायिक बांध निश्चित करा व नंतरच झाडे तोडा असे सांगितले याचा वरील नावाच्या दोन आरोपी यांना राग आला व त्यांनी फिर्यादी यास शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी व नंतर हातातील पावड्याने हातावर,डोक्यावर,पाठीवर मारहाण करून फिर्यादिस गंभीर दुखापत केली आहे.या प्रकरणी फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेत फिर्यादी स्वतः व त्याचा मुलगा अदनान ताजुद्दीन सय्यद (वय-२०)हे दोघे गंभीर जखमी झाले आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.०६/२०२१ भा.द.वि.कलम ३२६,३२५,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी युसूफ सय्यद,युनूस सय्यस यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तर आरोपी युसूफ सय्यद यांनीही फिर्यादी ताजुद्दीन सय्यद यांचे विरुद्ध असाच गुन्हा फिर्यादी ताजुद्दीन सय्यद व त्यांचा मुलगा अदनान सय्यद यांचे विरुद्ध भा.द.वि.कलम ३२६ वगळता दाखल केला आहे.त्यात फिर्यादी युसुफ सय्यद जखमी झाले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.बी.बाबर हे करीत आहेत.