जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..आता पतसंस्थांच्या ठेवींनाही संरक्षण-कोयटे यांची माहिती

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्रातील नागरी सहकारी, महिला सहकारी, ग्रामीण बिगरशेती पतसंस्थांची संख्या १६ हजारांचे वर असून या पतसंस्थांमध्ये १ लाख कोटी रुपयांचे वर ठेवी आहे. या ठेवींना संरक्षण देण्याची योजना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने तयार केली असून या योजनेद्वारे पतसंस्थांच्या ठेवींना ५० हजार रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“गेले अनेक वर्ष सहकार खाते, महाराष्ट्र शासन,भारतीय रिझर्व्ह बँक तसेच बँकांच्या ठेवींना विमा संरक्षण देणारी कंपनी डिपॉझीट इन्शुरन्स अॅड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करीत होतो.परंतु आता आम्हाला सहकार चळवळीविषयी अभिमान असल्याने अशा प्रकारची संस्था सहकारी तत्वावर निर्माण करण्याचे आम्ही ठरविले आहे”-राज्य फेडरेशनचे महासचिव शांतीलाल सिंगी.

पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देतांना ( IRDA) इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अॅथॉरीटी या संस्थेची परवानगी मिळविण्यापूर्वी विमा हा शब्द वापरता येणार नाही तरी देखील नावात विमा शब्द नसला तरी तत्सम संरक्षण पतसंस्थांच्या ठेवींना आता उपलब्ध होणार असल्याने ठेवीदारांनी पतसंस्थांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने शिर्डी येथे २ जानेवारी रोजी आयोजित राज्यातील प्रमुख पतसंस्था पदाधिकाऱ्यांच्या बैठक आयोजित करण्यात आली होती त्या प्रसंगी ते बोलत होते.

या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया चे संचालक सतीश मराठे,नॅशनल फेडरेशन ऑफ बँक अॅड क्रेडीट सोसायटीज या देशातील बँक व पतसंस्था फेडरेशनचे संचालक व सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी यांचेसह भारतातील सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक हे उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांना अडीअडचणीचे प्रसंगी अधिकाधिक निधी प्राप्त होण्याचे दृष्टीने (Asset Reconstruction Company) चे धर्तीवर (Statbilization Fund) स्थैर्य निधी या संस्थेची सहकारी तत्वावर स्थापना करण्याचा निर्णय या प्राथमिक बैठकीत घेण्यात आला आहे. अशा प्रकारची संस्था स्थापन होण्यासाठी स्थैर्य निधी म्हणुन १०६ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा महाराष्ट्रातील विवीध उपस्थित पतसंस्थांद्वारे केली गेली.तसेच (Liqiudity Base Protection Fund) हि संकल्पना देखील याच संस्थेद्वारे राबविण्यात येणार आहे.

या योजनेला पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्रातील बँका व पतसंस्थांची शिखर संस्था असलेली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तसेच भारतातील सर्वात मोठी पतसंस्था असलेली बुलडाणा अर्बंन पतसंस्था,शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्था देश पातळीवर बँका व पतसंस्थांची शिखर संस्था असलेली नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह बँक अॅड क्रेडीट सोसायटी यांचे देखील पाठबळ मिळत आहे.
या योजनेसाठी नॅशनल इन्शुरन्स अॅकॅडमी (INIA) चे मार्दर्शन घेण्यात येणार आहे.
राज्य फेडरेशनचे खजिनदार दादाराव तुपकर व उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव यांनी सांगितले कि, ‘सहकारी तत्वावर स्थापन झालेली अशा प्रकारची हि जगातील पहिलीच संस्था असेल’.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे म्हणाल्या कि, आंतराष्ट्रीय स्वरुपाची पतसंस्थांची आंतरराष्ट्रीय संस्था असलेली असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडीट युनियन या संस्थेशी देखील आम्ही चर्चा केली आहे. आंतरराष्ट्रीय पतसंस्था फेडरेशनने देखील या योजनेचे कौतुक करून हि संकल्पना जगभरातील पतसंस्था चळवळीला मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगितले असून राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांमधून शिखर संस्थांचे पाठबळ या योजनेला मिळणार असल्याने सहकार क्षेत्रात क्रांतिकारक ठरणाऱ्या या योजनेला सहकार खात्याने देखील प्रतिसाद देऊन सहकार्य करावे.
यापूर्वी शासनाने पंडित दिनदयाळ पतसंस्था ठेव संरक्षण योजना सहकार खात्याचे माध्यमातून जाहीर केली होती. तसेच नियामक मंडळाचे माध्यमातून सहकारी पतसंस्थांना अंशदानाची आकारणी करून नवी योजना जाहीर करण्याचा शासनाचा मानस आहे. परंतु या योजनांन्वये महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांमधून प्रतिसाद मिळाला नाही. या दोन्ही योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी निदर्शनास आल्याने दोन्ही योजना प्रत्यक्षात येणे शक्य वाटत नसल्यामुळे इतर राज्यातील सहकारी पतसंस्थांनी आपले संरक्षण आपणच केले पाहिजे या भावनेने या योजनेची निर्मिती केली असल्याचे मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close