गुन्हे विषयक
बस प्रवासात मोठी चोरी,गुन्हा दाखल!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी शहरात पुन्हा एकदा प्रवासादरम्यान चोरीची मोठी घटना समोर आली असून पुणे-शिर्डी बस प्रवासात तब्बल ८ लाख ७० हजार रुपये किमतीचे १६३.५० ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची फिर्याद दाखल झाली आहे.या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला असून पोलिस अधिकारी त्याचा तपास करत आहे.या घटनेने प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दाखल गुन्ह्यात फिर्यादी महिलेने आपल्या चोरीस गेलेल्या मालाचा तपशील दिला असून त्यात त्यांनी, ५० ग्रॅम वजनाचे २.५० लाख रुपयांचे सोन्याचे गंठण,४० ग्रॅम पूर्ण सोन्याचे ०२ लाख रुपयांचे गंठण.२० ग्रॅम वजनाचा ०१ लाख राणीहार,४० ग्रॅम पुरुषांच्या विविध डिझाईनच्या ०२ लाख रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या,२० ग्रॅम स्त्रियांच्या ०१ लाख रूपयांच्या सोन्याच्या अंगठ्या,३.५ ग्रॅम वजनाचे २० हजार किमतीचे कर्णफुले (साखळी व बदाम डिझाईन) असा एकूण ०८ लाख ७० हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल गेला असल्याचे म्हटले आहे.
शिर्डी आणि चोरटे यांचे समीकरण जुने आहे.शिर्डी अनेक राज्यातील आणि प्रांतांतील टोळ्या कार्यरत असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे.त्या शिर्डी परिसरातील उंची हॉटेल मध्ये थांबून चोरी करून रेल्वे आणि विमानाने फरार होत असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे.त्यामुळे पोलिसांना या आरोपींचा शोध घेणे मुश्किल होताना दिसून येत आहे.पूर्वी हैदराबाद येथील एक टोळी शिर्डी आणि परिसरात चोरी करून विमानाने फरार होत होती.योगायोगाने ती पकडली गेली होती.अशीच एक प्रवासी बस मधील घटना उघडकिस आली आहे.

यातील फिर्यादी महिला मंदाकिनी सुरेश बोधे (वय-६८) या विमानतळ रोड,श्रीकृष्णनगर,शिर्डी येथे वास्तव्यास आहेत.त्या आदर्श प्राथमिक विद्यालयातून शिपाई पदावरून सेवानिवृत्त झालेल्या आहेत.त्या दि.२ फेब्रुवारी २०२६ रोजी त्या पतीसह नातेवाईकांच्या लग्नासाठी पुण्यात गेल्या होत्या.लग्नसमारंभा नंतर धायरी येथे बहिणीकडे मुक्काम केला होता.लग्नात परिधान केलेले स्वतःचे व पतीचे सर्व सोन्याचे दागिने त्यांनी काळजीपूर्वक लाल रंगाच्या बॉक्समध्ये ठेवून तो प्रवासी ट्रॉली बॅगमध्ये कपड्यांमध्ये सुरक्षित ठेवला होता.दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता धायरी येथून रिक्षाने वाकडेवाडी एस.टी.बस स्थानक गाठून,सकाळी ९ वाजताच्या सुमारास पुणे-धुळे जाणाऱ्या बसमध्ये बसून शिर्डीकडे प्रस्थान केले होते.त्यांचे प्रवास करून सायंकाळी ४ वाजता शिर्डी बसस्थानकात आगमन झाले.घरी पोहोचल्यानंतर रात्री सुमारे ९ वाजता ट्रॉली बॅग उघडून पाहिली असता लाल रंगाचा दागिन्यांचा बॉक्स पूर्णपणे गायब असल्याचे लक्षात आले होते.आपली बॅग पूर्ण तपासूनही बॉक्स न सापडल्याने चोरी झाल्याची खात्री पटली होती.त्यामुळे त्या पुरत्या हादरून गेल्या होत्या.
दरम्यान त्यांनी अखेर शिर्डी पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यात यांनी चोरीस गेलेल्या दागिन्यांचा तपशील दिला असून त्यात ५० ग्रॅम वजनाचे २.५० लाख रुपयांचे सोन्याचे गंठण,४० ग्रॅम पूर्ण सोन्याचे ०२ लाख रुपयांचे गंठण.२० ग्रॅम वजनाचा ०१ लाख राणीहार,४० ग्रॅम पुरुषांच्या विविध डिझाईनच्या ०२ लाख रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या,२० ग्रॅम स्त्रियांच्या ०१ लाख रूपयांच्या सोन्याच्या अंगठ्या,३.५ ग्रॅम वजनाचे २० हजार किमतीचे कर्णफुले (साखळी व बदाम डिझाईन) असा एकूण ०८ लाख ७० हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने गायब केला आहे.त्यामुळे या महिलेचे आणि कुटुंबांचे धाबे दणाणले आहे.

दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी आपल्या दप्तरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्र.१०६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे याचे मार्गदर्शनाखाली पोलीस करत करीत आहे.पोलिस या प्रकरणी विविध राज्य परिवहन मंडळाच्या आगारातील चलचित्रण फिती तपासात आहेत.व नागरिकांना सार्वजनिक प्रवासात मौल्यवान दागिने किंवा रोकड स्वतंत्र लॉक असलेल्या पिशवीत ठेवावी.शक्यतो मौल्यवान वस्तू हाताशी ठेवाव्यात व संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे असे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे.



