गुन्हे विषयक
तरुणांची आत्महत्या,कोपरगावात अकस्मात मृत्यू नोंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मढी खु.ग्रामपंचायत हद्दीतील नाशिकरोड लगत गोदावरी उजव्या कालव्याजवळ रहिवासी असलेला तरुण रवींद्र निवृत्ती गवळी (वय-३५) याने अज्ञात कारणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.या संबंधी विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहे.त्याच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.
नैराश्याचं शेवटचं टोक म्हणजे आत्महत्या असा सर्वसाधारण समज आहे.याचं कारण डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येचं प्रमाण सर्वांत जास्त आहे.मग आत्महत्येचा विचार नैसर्गिक असतो ? का यामागे वैद्यकीय कारणं आहेत ? या प्रश्नी मनोविकारतज्ज्ञ सांगतात,”आत्महत्येचा विचार नैसर्गिक नसतो.मेंदूतील बायो-न्यूरॉलॉजीकल बदलामुळे लोकांना जीवन व्यर्थ वाटू लागतं.त्यामुळे,आत्महत्येचे विचार येतात.आत्महत्येच्या ९० टक्के प्रकरणात मानसिक आजार प्रमुख कारण असल्याचे सांगतात.मात्र या तरुणाने कोणत्या कारणाने हि आत्महत्या केली हे समजू शकले नाही.
दरम्यान “डिप्रेशन किंवा नैराश्यात असलेले लोक जगाकडे नेहमीच नकारात्मक नजरेने पहातात.जणू त्यांनी नकारात्मक विचारांचा चष्मा घातलेला असतो.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील मढी खु.येथे घडली असून आज सायंकाळी सहा पूर्वी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात सदर तरुणास भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यास मृत घोषित केले आहे.मात्र तो मयत तरुण हा व्यसनाधीन असल्याचे समजते.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यु नोंद क्रं.४७/२०२३ सी.आर.पी.सी.१७४ अनव्ये नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गजाजन वांढेकर हे करीत आहेत.