कोपरगाव तालुका
“साखरपेरणी “माणुसकीचा गोडवा निर्माण करणारा कविता संग्रह- पत्रकार कुलथे

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
डॉ. दादासाहेब गलांडे यांच्या “साखरपेरणी “कवितासंग्रहातून मानवी प्रेमाचा गोडवा आणि ग्रामजीवनातील सुधारणाशील मानसिकतेचा प्रत्यय येतो असे प्रतिपादन महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
कोपरगाव येथील जेष्ठ साहित्यिक डॉ.दादासाहेब गलांडे यांच्या “साखरपेरणी” कवितासंग्रहाचे नुकतेच प्रकाशन संपन्न झाले त्या प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी ग्रामीण साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये होते.
सदर प्रसंगी जेष्ठ ग्रामीण साहित्यिक मन्साराम पाटील,डॉ. शिवाजी काळे,सुधीर कोयटे,डॉ.बाबुराव उपाध्ये,डॉ.दादासाहेब गलांडे,पत्रकार प्रकाश कुलथे, बाळासाहेब भांड,हेमचंद्र भवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजक हेमचंद्र भवर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.तर कवी डॉ.दादासाहेब गलांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून सर्व मान्यवरांचा सन्मान केला आहे.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”डॉ. दादासाहेब गलांडे यांनी बहुविध स्वरूपाची साहित्य निर्मिती करून कोपरगाव हे नाव साहित्यक्षेत्रात सर्वत्र प्रतिष्ठित केले आहे.अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये म्हणाले “साखरपेरणी “नावाप्रमाणे गोड असून मन्साराम पाटील,अविनाश पाटील,सुधीर कोयटे,डॉ.दादासाहेब गलांडे, हेमचंद्र भवर आहे गुणी साहित्यिकांमुळे कोपरगावची साहित्यिक श्रीमंती वाढली आहे.हा कवितासंग्रह प्रबोधन करणारा असून त्यातून कोपरगाव पंचक्रोशीचे चित्र पाहण्यास मिळते असे मत व्यक्त केले.डॉ.शिवाजी काळे,पत्रकार बाळासाहेब भांड यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.तर डॉ.गलांडे यांनी आभार मानले.